विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:49 PM2018-10-19T22:49:17+5:302018-10-19T22:49:53+5:30

मागील अनेक वर्षात विदर्भाला कमी निधी दिला जात होता. विदर्भातील अनेक प्रकल्प रेंगाळले. विदर्भाचा विकास पाहिजे. त्या प्रमाणात झाला नाही. आता राज्याच्या तिजोरीची चाबी चंद्रपुरात आहे.

Funding for development will not ease | विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : वरोरा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील अनेक वर्षात विदर्भाला कमी निधी दिला जात होता. विदर्भातील अनेक प्रकल्प रेंगाळले. विदर्भाचा विकास पाहिजे. त्या प्रमाणात झाला नाही. आता राज्याच्या तिजोरीची चाबी चंद्रपुरात आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वरोरा न.प.च्या वतीने पार पडलेल्या विकासकामांच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी मंत्री संजय देवतळे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, जि.प. कृषी सभापती अर्चना जिवतोडे, पं.स. वरोरा सभापती रोहिणी देवतळे, चंद्रपूर मनपाचे सभापती राहुल सराफ, विजय राऊत, चंद्रकांत गुंडावार व न. प. सभापती सदस्य उपस्थित होते.
नगर परिषदेच्या वतीने अत्याधुनिक मत्स्यविक्री बाजारपेठ, महात्मा गांधी उद्यानातील योगा शेड लोकार्पण, महात्मा गांधी चौकातील सौंदर्यीकरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन ना. सुधीर मुगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हयातील सर्वच भागात विकासकामांसाठी मोठया प्रमाणावर निधी आम्ही उपलब्ध केला आहे. ब्रम्हपूरी, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, जिवती, राजुरा, चिमूर सर्वच भागांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होवून विकासप्रक्रिया गतिमान झाली आहे. जात, धर्म, पंथ, पक्ष यांच्या भिंती बाजूला सारून सर्वसमावेशक पध्दतीने सर्वांना न्याय देत आम्ही विकास प्रक्रिया राबवित आहोत.
पोंभुर्णा येथे १००० आदिवासी महिलांची कुक्कुटपालन संस्था महाराष्ट्रातील पहिली कुक्कुटपालन संस्था आपण स्थापन केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्प आपण राबवित आहोत. विकास ही सर्वांची जबाबदारी आहे. सबका साथ सबका विकास या माननीय पंतप्रधानांच्या निर्धारानुसार या जिल्ह्याला राज्यातील प्रगत जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी मंत्री देवतळे व नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिला बचतगटांचा सत्कार करण्यात आला. ई-रिक्षा चालकांना चाब्या सुपूर्द करण्यात आल्या.
शहरातील विविध संघटनांनी ना. मुनगंटीवार यांचा सत्कार केला. प्रास्ताविक न.प. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, संचालन प्रा. डॉ. प्रशांत खुळे यांनी केले.
शिवसेनेची मागणी पूर्ण
सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन झाले. त्या माार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना गटनेता गजानन मेश्राम, नगरसेवक राजू महाजन यांनी केली होती. सभागृहात ठराव पारित करून या मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मार्ग नाव देण्यात आले.

Web Title: Funding for development will not ease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.