शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

कुणबी समाजाचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:06 IST

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य मंत्रिमंडळाला केलेल्या शिफारशीत अन्याय झाल्याचा आरोप करून ओबीसी आरक्षण समर्थक, कुणबी समाज तालुक्याच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देअन्यायाविरुद्ध एल्गार : विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य मंत्रिमंडळाला केलेल्या शिफारशीत अन्याय झाल्याचा आरोप करून ओबीसी आरक्षण समर्थक, कुणबी समाज तालुक्याच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.राज्य मागासवर्ग आयोगाने २८ आॅक्टोबर २०१४ ला महाराष्ट्र शासनास सादर केलेल्या क्रिमिलेअर अटीच्या शिथिलतेबाबत सादर केलेल्या शिफारसींमध्ये कुणबी समाजाला वगळण्यात आले आहे. त्याबाबत ५ ते २६ आॅक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये शासनाकडून आक्षेप व सूचना मागविण्यात येत असल्याचे वृत्तपत्रामधून प्रकाशित झाले आहे. त्यामुळे कुणबी समाजाने हजारोच्या संख्येत मूक मोर्चा काढून आज आक्षेप नोंदविला. महाराष्ट्रातील कुणबी समाज हा केवळ शेतीशी निगडीत असल्याने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या विकासापासून वंचित आहे. त्यामुळे या समाजास क्रिमिलेयर अट शिथिल करण्यात यावी, ओबीसी समूहासाठी लागू केलेली क्रिमिलेयरची अट असंविधानिक असल्याने रद्द करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, विलास उरकुडे, अंजली उरकुडे, राकेश तलमले, अ‍ॅड. मनोहर उरकुडे, प्रा. प्रकाश बगमारे, सुचित्रा ठाकरे, दामोधर मिसार, हितेंद्र राऊत, वामन पारधी, वासु सौंदरकर, सचिन राऊत, वामन मिसार, विष्णू तोंडरे, प्रा. हितेंद्र धोटे, अविनाश राऊत, वेणू तोंडरे आदींसह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.कष्टकºयांची उपेक्षा थांबवाकुणबी समाज हा पूर्णत: शेतीवर निर्भर आहे. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या विकासापासून वंचित असल्याने गावखेड्यांत आजही अन्याय सुरू आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानातील तरतुदीनुसार न्याय देणे, ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासनाने कष्टकरी कुणबी समाजाला विविध सोईसवलती प्रदान केल्या पाहिजे. मात्र, चुकीचे धोरण राबविणे सुरू असल्याने कुणबी समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली.