शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

किरकोळ व्यापाºयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:47 IST

वरोरा नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शेकडो किरकोळ व्यावसायिकांच्या दुकानावर बेकायदेशीररित्या जे.सी.बी. चालविला.

ठळक मुद्देश्रमिक एल्गारचे नेतृत्व : स्ट्रीट वेंडर अ‍ॅक्ट लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शेकडो किरकोळ व्यावसायिकांच्या दुकानावर बेकायदेशीररित्या जे.सी.बी. चालविला. त्यांच्या दुकानाची तोडफोड केली. या विरोधात किरकोळ व्यावसायिकांनी श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात वरोरा नगरपालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून स्ट्रीट वेंडर अ‍ॅक्ट २०१४ या कायद्यानुसार किरकोळ व्यावसायिकांना संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.नगरपालिकेसमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या. वरोरा शहरातील किरकोळ व्यावसायिकांचे व त्यांच्या उपजिविकेचे संरक्षण करण्याकरिता केंद्र सरकारने स्ट्रीट वेंडर अ‍ॅक्ट २०१४ लागू केला असून या कायद्यान्वये राज्य सरकारने काही नियम तयार केले आहे. हा कायदा वरोरा नागरपरिषदेलाही लागू आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार जोपर्यंत शहरात नगर विक्रेता समिती तयार होत नाही व या समितीकडून शहरातील किरकोळ व्यावसायिकांचे सर्व्हेक्षण होत नाही, तोपर्यंत कुणालाही रस्त्यावर व्यवसाय करण्यापासून थांबविता येत नाही. असे असताना वरोरा नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटावच्या नावाने किरकोळ व्यावसायिकांची दुकाने जे.सी.बी. लावून तोडण्यात आले. ही बाब कायद्याचा भंग करणारी व गरीब वेंडरवर अन्याय करणारी आहे. याचा जाब विचारण्याकरिता स्ट्रीट वेंडरचा मोर्चा आहे, असे अ‍ॅड. गोस्वामी यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले.किरकोळ व्यावसायिकांच्या दुकानावर बुलडोजर चालविला तर त्यांच्या संसारावर देखील नागर फिरवला असे होते. आज वरोºयात व्होल्टाज, प्रीस्टज, वर्धा पॉवर, जी. एम. आर. सारख्या कंपन्यांतून काढून टाकण्यात आलेले नोकरदार नोकºया न मिळालेले सुशिक्षित बेरोजगार, कुशल-अकुशल कामगार, नापिकी-कर्जबाजारीने त्रस्त शेतकरी आत्महत्या, चोरी, दरोडे, लुटमारी, वाटमारी, अवैध दारूची विक्री करण्याऐवजी रस्त्यावर व्यवसाय करून पोट भरतो हा गुन्हा आहे का?अनेकांनी आपले दागिने गहान ठेवून, बँकेतून व खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन दुकानदारी उभी केली. उधारवाडी करून माल भरला.अशा परिस्थितीत कसाबसा नेटाने संसार चालू असताना पोलिसांची दंडुकेशाही वापरून बळजबरीने बेकायदेशीररित्या आपल्या नगरपरिषदेने किरकोळ व्यावसायिकांवर अन्याय केला आहे. स्ट्रीट वेंडर कायद्यानुसार आमच्या किरकोळ व्यावसायिकांचे संरक्षण झाले पाहिजे. अन्यथा या पुढे अतिशय तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.या आंदोलनाला अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, विजय सिध्दावार, डॉ. मनोज तेलंग, रुपेंद्र तेलंग, आशिष पेटकर, घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, रवी लोणारे, आनंद गेडाम, रेवती इंगोले, मनिषा लोनगाडगे, संजय नारोळे तथा शेकडो किरकोळ व्यापारी व नागरिक उपस्थित होते.अवैध दारूविक्रीबाबत पोलिसांना इशाराबेकायदेशीररित्या अतिक्रमण हटाव मोहिमेकरिता पोलिसांच्या दंडुकेशाहीचा वापर करण्यात आला. पोलिसांनी किरकोळ व्यावसायिकांवर आपल्या बळाचा वापर करण्यापेक्षा, दारूबंदी असतानाही वरोºयात सर्रास अवैध दारूविक्री चिरीमिरी, हप्ते घेऊन सुरु आहे, आपल्या शौर्याचा वापर तिथे करावा आणि बेकायदेशीररित्या नगरपरिषदेने स्ट्रीट वेंडरवर कारवाई केल्यास हा अन्याय सहन करणार नाही, असा सूचक इशारा यावेळी पोलिसांना दिला.सोमवारी बैठकीचे आयोजनवरोरा येथील न.प.चे मुख्याधिकारी बल्लाळ हे शासकीय कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने निवेदन कार्यालयीन अधीक्षक डॉ. कोटेजा यांनी स्वीकारले. त्यामुळे वेंडर अ‍ॅक्टबाबत सविस्तर चर्चा करण्याकरिता सोमवारला श्रमिक एल्गार संघटनेचे पदाधिकारी, किरकोळ व्यावसायिकांचे प्रतिनिधी व मुख्याधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून तसे लिखित पत्र यावेळी शिष्टमंडळाला देण्यात आले.