शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मोफत अन्न-धान्य वाटपाला सावली व सिंदेवाहीतून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही. लाकडाऊनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळाले नाही. त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आहे.

ठळक मुद्देगोरगरिबांना दिलासा : गरजवंतांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्र्याचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लाकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंत, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून ब्रम्हपुरीनंतर सावली व सिंदेवाहीतील गरजू, शेतमजूर, कष्टकरी, गरीब कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतके अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून रविवारी तहसिल कार्यालय सावली व सिंदेवाहीच्या परिसरात शुभारंभ करण्यात आला.निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही. लाकडाऊनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळाले नाही. त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आहे.पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून सावली व सिंदेवाही तालुक्यातील गरजवतांना मोफत जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या शुभारंभाप्रसंगी सावली येथे नगराध्यक्ष नगरपंचायत विलास यासलवर, सभापती पंचायत समिती विजय कोरेवर, तहसीलदार पी.के.कुमरे, सरपंच राजू सिद्धम, दिनेश चिटनूरवार, ठाणेदार बाळासाहेब खाडे, मुख्याधिकारी मंजुषा वाजळे तसेच सिंदेवाही येथे नगराध्यक्ष नगरपंचायत आशाताई गंडाते, सदस्य जिल्हा परिषद रमाकांत लोंढे, स्वप्नील कावळे, नरेंद्र भैसरे, अरुण कोलते, सिमताई साखरे, राहुल पोरेड्डीवार, विरेंद्र जैस्वाल उपस्थित होते. तर यावेळी दिव्या संघपाल दुधे, मालू बंडू मेदपल्लीवार, मिनाक्षी राऊत, शालू मेदपल्लीवार यांच्यासह ३० तर सिंदेवाही येथे जयप्रकाश बबन शेंडे, रोशनी चारसिंग ताक, शिफा स्लिम, सुरेश पस्तंवार यांच्यासह ३० लाभार्थ्यांना अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लोकांना खºया अर्थाने आधार देण्याचे काम पालकमंत्रीविजय वडेट्टीवार करीत आहेत.प्रति कुटूंब दहा किलो तांदूळकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लाकडाऊन केले. संपुर्ण लॉकडाउनमूळे वाहतूक थांबली, कामधंदे मिळणे थांबले, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. एकूणच हातावर पोट असणाºया आणि गोर-गरीब जनतेवर याचा पर्यार्याने प्रतिकूल परिणाम होत आहे. मग ज्याचे हातावर पोट आहे, त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार अशा परिस्थीतीत त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामार्फत ब्रम्हपुरीनंतर आज सावली आणि सिंदेवाहीत प्रति कुटूंब १० किलो तांदूळ,दोन किलो तूर डाळ, एक किलो खाद्य तेल, २०० ग्राम मिरची पावडर, ५० ग्राम हळद पावडर, एक किलो मीठ, एक साबण या जीवनावश्यक वस्तूचे किट मोफत वाटप करण्यात आले. वाटप करताना शासनाने लावलेल्या कलम १४४ चे पालन करण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस