शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आरटीई अंतर्गत ७२ हजार बालकांना मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:33 IST

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१८- २०१९ या सत्रासाठी तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील आठ हजार ९७६ शाळांमध्ये ७२ हजार ८७३ बालकांना मोफत प्रवेश मिळाला आहे.

ठळक मुद्दे५३ हजार २३६ जागा अद्यापही रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरिमल डोहणेचंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१८- २०१९ या सत्रासाठी तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील आठ हजार ९७६ शाळांमध्ये ७२ हजार ८७३ बालकांना मोफत प्रवेश मिळाला आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या सोडतीनंतरही राज्यात तब्बल ५३ हजार २३६ जागा रिक्त आहेत.आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्चशिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळांमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती़ यानुसार राज्यभरात आठ हजार ९७६ शाळांची यादी शासनाने जाहीर केली़ २५ टक्के कोट्यानुसार एक लाख २६ हजार १०९ बालकांना मोफत प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी महाराष्ट्रातून एक लाख ९९ हजार ११ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले. त्यापैकी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या सोडतीमध्ये एक लाख ११ हजार ७८ बालकांची निवड करण्यात आली. त्यापैकी केवळ ७२ हजार ८७३ बालकांंनी संबंधित शाळांमध्ये प्रवेश निश्चित केला. तिसरी सोडत जाहीर झाल्यानंतरही राज्यभरात ५३ हजार २३६ जांगा रिक्त आहेत. त्यासाठी येत्या काही दिवसांत सोडत काढण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेशपुणे येथे ९३० शाळांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार १६ हजार २९१ जागा निर्धारित करण्यात आल्या होत्या. यासाठी ४३ हजार ५८३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ११ हजार ८३० जणांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तर नागपूरमध्ये पाच हजार ७४१, ठाणे पाच हजार ६८४, नाशिक चार हजार ६०९, औरंगाबाद तीन हजार ६०७, अहमदनगर तीन हजार १८२, अमरावती दोन हजार ४६० तर बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार १७० बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा