लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रामनगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वाहतूक कार्यालयाजवळ नाकाबंदी करुन एका वाहनातून तब्बल २६ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करुन दोघांना अटक केली. अपूर्व हर्षीद मुजुमदार (३०), सुकेश बैद्यनाथ सरकार (२०) दोघेही रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.एका आयशर वाहनातून सुंगधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वाहतूक कार्यालयाजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच ३४ ए. व्ही २४३३ या वाहनाची झडती घेतली असता हिरव्या रंगाच्या चुंगड्यामध्ये ३६०० नग मजा एकूण किंमत १४ लाख ४० हजार, १५ रंगाच्या पांढऱ्या चुंगड्यामध्ये १६० नग इंगल कंपनीचा हुक्का शिशा तंबाखुचे पाऊच १२ लाख रुपये, २५ नग साखरेच्या पांढऱ्या रंगाच्या चुंगड्या किंमत ५० हजार रुपये, एक आयशर कंपनीचे वाहन असा एकूण ३९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संदीप कापडे, पोलीस हवालदार मनोहर कामडी, रजनीकांत पुठ्ठावार, गजानन डोईफोडे, ना.पो.शि संजय चौधरी, पुरुषोत्तम चिकाटे, पो. शि. विकास जुमानके, म. पो. शि. भावना रामटेके यांनी केली.
चंद्रपुरात २६ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST
माहितीच्या आधारावर पोलिसांनी वाहतूक कार्यालयाजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच ३४ ए. व्ही २४३३ या वाहनाची झडती घेतली असता हिरव्या रंगाच्या चुंगड्यामध्ये ३६०० नग मजा एकूण किंमत १४ लाख ४० हजार, १५ रंगाच्या पांढऱ्या चुंगड्यामध्ये १६० नग इंगल कंपनीचा हुक्का शिशा तंबाखुचे पाऊच १२ लाख रुपये, २५ नग साखरेच्या पांढऱ्या रंगाच्या चुंगड्या किंमत ५० हजार रुपये, एक आयशर कंपनीचे वाहन असा एकूण ३९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली.
चंद्रपुरात २६ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
ठळक मुद्देदोघांना अटक : रामनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई