शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार ६०६ वीज ग्राहकांची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:07 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत चार हजार ६०६ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देधडक मोहीम : थकबाकीविरोधात महावितरणची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत चार हजार ६०६ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना आॅनलाईन पेमेंट, मोबाईल अ‍ॅप, एनी टाईम पेमेंट मशीन्स यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु अनेक थकबाकीदारांनी अद्यापही वीज बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे महावितरणच्या अंगावरील बोझा वाढत चालला आहे. वीजबिल वसुली, वीजचोरी पकडणे अशा अनेक कामात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची उर्जा खर्च होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वारंवार जनजागृती करून देयकाचा भरणा करण्याविषयी सांगितले जात आहे. मात्र याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता थकबाकीदारांविरोधात महावितरणने धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. थकबाकीदारामुळे महावितरणला अडचणीचा सामना करावा लागत आहे.महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ५१ लाख रुपये थकबाकी आहे. वाणिज्यिक गाहकांकडे सहा कोटी नऊ लाख तर औद्योगिक ग्राहकांकडे ६४ लाख थकबाकी जमा झाली आहे. ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडे ९७ लाख तर ग्रामीण व शहरी पथदिव्यांची थकबाकी २२५ कोटी रुपयांवर पोहचली आहे.महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे.वीज ग्राहकांकडून वीज बिल विहित मुदतीत वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच वसुलीत निष्काळजीपणा बाळगणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कठोर कारवाईचे निर्देश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिले आहेत.दरम्यान, या अनुषंगाने महावितरणने आता धडक मोहीम सुरू केली असून आतापर्यंत चार हजार ६०६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बिलाचा भरणा न केल्यामुळे खंडित केला आहे.थकबाकीदार ग्राहकांनी थकित असलेले वीज बिल त्वरित भरून महावितरणला सहकार्य करावे. व आपला वीज पुरवठा सुरळीत ठेवावा.-अरविंद भादिकर, मुख्य अभियंता,महावितरण, चंद्रपूर.

टॅग्स :electricityवीज