शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा बफर झोनमध्ये सुरू होणार पर्यटकांसाठी चार नवे प्रवेशद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:32 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटकांची सातत्याने गर्दी वाढत आहे. यावर पर्याय म्हणून ताडोबा बफर झोनमध्ये झरी, पांगडी, मामला व रामदेगी येथे नव्याने चार प्रवेशद्वार लवकरच खुले करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देव्यवस्थापनेचा निर्णय पर्यटकांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटकांची सातत्याने गर्दी वाढत आहे. मात्र, सद्यस्थितीत केवळ सात प्रवेशद्वार सुरू असल्याने शेकडो पर्यटकांना पर्यटनाची संधी मिळत नाही. सतत हाऊसफुल्ल गर्दीमुळे निराश होऊन परतावे लागते. यावर पर्याय म्हणून ताडोबा बफर झोनमध्ये झरी, पांगडी, मामला व रामदेगी येथे नव्याने चार प्रवेशद्वार लवकरच खुले करण्यात येणार आहेत.ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १ आॅक्टोबरपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दसरा व दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल्ल होता. येत्या काही दिवसांत ख्रिसमसच्या सुट्या लागणार आहेत. या कालावधीत बुकिंग फुल्ल होते. देशविदेशातील पर्यटकांमुळे कोअर झोनमध्ये पर्यटकांची सतत अधिक गर्दी वाढत आहे. सध्या या प्रकल्पातील सहा प्रवेशद्वारातून पर्यटक येत असल्याने दिवसभरात सुमारे ११९ वाहनांचे बुकिंग होते. यामुळे अनेक पर्यटकांना निराश होऊन परत जावे लागते तर काहींना ताडोबा बफर झोनमध्ये जंगल सफारी करावी लागते. आता तर बफर झोनही हाऊ सफुल्ल राहत आहे. ताडोबा बफर झोनमध्ये आगरझरी, देवाडा अडेगाव, जुनोना, कोलारा, नवेगाव, अलीझंझा व मदनापूर- कोलारा हे सात प्रवेशद्वार सुरू आहेत. या प्रवेशद्वारांमधूनही प्रचंड गर्दी होते. परिणामी, व्याघ्र दर्शनाऐवजी केवळ जंगल सफारीवरच समाधान मानावे लागत आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना अडचणी येऊ नयेत. गर्दीमुळे परत जाण्याच्या घटना घडू नये, या हेतूने झरी, पांगडी, मामला व रामदेगी हे चार प्रवेशद्वार लवकरच उघडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बफर झोनमधील प्रवेशद्वारांची संख्या ११ होईल.-गजेंद्र नरवने, उपवनसंरक्षक ताडोबा (बफर)

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प