शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

प्रचाराला चार दिवस शिल्लक

By admin | Updated: February 12, 2017 00:31 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

दिग्गज नेते उतरले मैदानात : कर्मचाऱ्यांना इव्हीएम मशिनबाबत प्रशिक्षणचंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी विविध पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. त्याच वेळी प्रशासनानेही मतदानाबाबत पूर्वतयारी सुरु केली आहे.५६ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ११२ पंचायत समिती मतदारसंघासाठी १६ फेब्रुवारी निवडणूक होत आहे. त्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. संजय धोटे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, काँग्रेसतर्फे विधानसभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी खा. नरेश पुगलिया, माजी आ. सुभाष धोटे, डॉ. अविनाश वारजूरकर, डॉ. आसावरी देवतळे, शिवसेनेतर्फे आ. बाळू धानोरकर, उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार, राष्ट्रवादीतर्फे सहकार नेते बाबासाहेब वासाडे, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, शेतकरी संघटनेतर्फे अ‍ॅड. वामनराव चटप आदी प्रचाराच्या रणभेरीमध्ये उतरले आहेत. या नेत्यांनी शनिवारी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. प्रचारासाठी आता चार दिवस शिल्लक राहिले आहेत. १६ फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी दुपारी ३ वाजता प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षा आणि उमेदवारांना प्रचाराची घाई झाली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या नेत्यांचे बळ मिळाले आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांना स्वत:च्या क्षमतेवर आणि जनसंपर्कावर अवलंबून राहावे लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक कामासाठी ड्युटी लावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना १२ फेब्रुवारी रोजीपासून ईव्हीएम मशिनबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता निवडणूक अधिकारी आणि या कामात व्यस्त कर्मचारी सज्ज झाले आहेत. मतदारांना निवडणूक ओळखपत्र व मतदान चिठ्ठी देण्यात आलेली आहे. मतदान करताना ज्या मतदारांना फोटो ओळखपत्र दाखवणे शक्य नाही, अशा मतदारांना फोटो असलेली मतदार चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)भाजपने दाखविला बंडखोरांना बाहेरचा रस्ताजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वाधिक मागणी भाजपमध्ये होती. परिणामी भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. काँग्रेसने आपल्या बंडखोरांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश संपादन केले. परंतु भाजपमध्ये प्रयत्न करूनही सात कार्यकर्त्यांनी पक्षांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणुकीत उडी घेतली. त्यामुळे कमलाकर लोणकर, देवराव कोठेवार, अश्वजित जनबंधू, राजविलास शामकुळे, चंद्रशेखर रतनकर, सुमन लोहे व मोरेश्वर लोहे यांना जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सहा वर्षांकरिता निलंबित केले आहे.