बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिकेला ब वर्गाचा दर्जा आहे. सांस्कृतिक चळवळीशी जुळलेल्या शहरात नाट्यगृहाची उणीव होती. राज्य सरकारने ही उण्ीाव दूर करून चार कोटींच्या निधीची तरतूद नाट्यगृहासाठी केली. आता बल्लारपूर शहरात नाट्यगृह बांधले जाणार असल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींना दिलासा मिळाला आहे.येथील नाट्यगृह बांधकामाचे भूमिपूजन आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलजवळील प्रांगणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष छाया मडावी, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष तारासिंग कलशी, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, नगरसेवक देवेंद्र आर्य, नासीर खान, डॉ. सुनिल कुलदीवार, गजानन दिवसे, शोभा महंतो यांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना घनश्याम मुलचंदानी म्हणाले, राज्य सरकारने शहराच्या विकासासाठी मोठी मदत केली. अद्ययावत नाट्यगृहाच्या बांधकामासाठी चार कोटी रुपये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी व आवश्यक ठिकाणी पाईप लाईन टाकण्यासाठी सहा कोटी रुपये, त्याच प्रमाणे मूल शहरातील माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या स्मारकासाठी व शहरात पायाभूत सुविधा देण्यासाठी १० कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आवश्यक ठिकाणी वृक्षारोपण करून स्वच्छ व सुंदर शहर करण्याच्या संकल्प नगराध्यक्ष छाया मडावी यांनी व्यक्त केला. संचालन गटनेते देवेंद्र आर्य यांनी तर आभार नासीर खान यांनी मानले. नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपुरात साकारणार चार कोटींचे नाट्यगृह
By admin | Updated: August 10, 2014 22:55 IST