शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

नगरसेवक नंदू नागरकर हे चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, सोबतच महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पक्षाची भूमिका वठवत आले आहे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी फिरायला गेले होते. आपल्या नेहमीच्या मित्रांसोबत चहा घेतल्यानंतर ते घराकडे परत जातांना काही अज्ञात तरुणांनी दुचाकीने त्यांची वाट अडवून हुज्जत घातली. अशातच दोन तरुणांनी मागाहून हॉकी स्टिक आणि बॅट घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व मनपा नगरसेवक नंदू नागरकर हे शुक्रवारी सकाळी ९ वाजता आझाद गार्डन परिसरात फिरायला गेले असता त्यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये त्यांना बॅट आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत नंदू नागरकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चंद्रपूर येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पायाला टाके मारावे लागले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव बंटी नागरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नागरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या युवकांच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्यामुळे त्यांची ओळख मात्र पटली नाही. शनिवारी चंद्रपुरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नागरकर यांच्यावर झालेला हल्ला राजकीय स्वरूपाचा तर नसेल ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात   आहे. नगरसेवक नंदू नागरकर हे चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, सोबतच महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पक्षाची भूमिका वठवत आले आहे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी फिरायला गेले होते. आपल्या नेहमीच्या मित्रांसोबत चहा घेतल्यानंतर ते घराकडे परत जातांना काही अज्ञात तरुणांनी दुचाकीने त्यांची वाट अडवून हुज्जत घातली. अशातच दोन तरुणांनी मागाहून हॉकी स्टिक आणि बॅट घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी  अज्ञात आरोपींवरुद्ध कलम ३२४, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला  आहे.

हल्लेखोरांना अटक न केल्यास आंदोलन- शहर जिल्हा काँग्रेस कमिटी- काँगेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शहर ठाणेदारांकडे केली. पोलिसांनी हल्लेखोरांना केली नाही तर अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून दिला. शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, कोषाध्यक्ष पप्पू सिद्दीकी, एनएसयुआयचे कुणाल चहारे, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, नौशाद शेख, कासिफ अली सहभागी होते.

उच्चस्तरीय चौकशी करा- प्रकाश देवतळे  

- नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. काही दिवसांपूर्वी शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वाहने फोडण्याचा प्रकार अज्ञात हल्लेखोरांनी केला होता. या घटनेत माझी स्कॉर्पिओ गाडी फोडली होती. याबाबत  रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी