शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाहीत वनरक्षकच निघाला वनभक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 05:00 IST

आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक हे बऱ्याच महिन्यापासून घरात फर्निचर बनवीत असल्याचा सुगावा वन अधिकाऱ्यांना मिळाला होता.  यासाठी लागणारे सागवान लाकूड जंगलातून तोडून घरी आणत होते. वाढईमार्फत हातकटाईव्दारा साईज बनवून फर्निचरचा व्यवसाय करीत होते. माहिती मिळताच दक्षता वनविभागाचे प्रभारी विभागीय वन अधिकारी सतीश चोपडे यांच्या नेतृत्वात व चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनात २१ ऑक्टोबरला आलेवाही वनरक्षकाच्या राहत्या नाक्यावर   धाड टाकून     सागवान ३१ नग सागवान (किंमत दोन लाख रुपये) जप्त करण्यात आले.

आनंद भेंडेलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी वनपरिक्षेत्रामधील आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक प्रशांत माणिकराव गायकवाड हे वनपरिक्षेत्रातील सागवान वृक्षाची तोंड करून  वन नाक्यावर आणून फर्निचरचा व्यवसाय करीत असल्याचे समजताच  दक्षता वनविभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी सतीश चोपडे यांनी धाड टाकून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सागवान जप्त केले. याप्रकरणी वनरक्षक गायकवाड याला अटक करून निलंबित करण्यात आले आहे.आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक हे बऱ्याच महिन्यापासून घरात फर्निचर बनवीत असल्याचा सुगावा वन अधिकाऱ्यांना मिळाला होता.  यासाठी लागणारे सागवान लाकूड जंगलातून तोडून घरी आणत होते. वाढईमार्फत हातकटाईव्दारा साईज बनवून फर्निचरचा व्यवसाय करीत होते. माहिती मिळताच दक्षता वनविभागाचे प्रभारी विभागीय वन अधिकारी सतीश चोपडे यांच्या नेतृत्वात व चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनात २१ ऑक्टोबरला आलेवाही वनरक्षकाच्या राहत्या नाक्यावर   धाड टाकून     सागवान ३१ नग सागवान (किंमत दोन लाख रुपये) जप्त करण्यात आले. गायकवाड याच्यावर वन गुन्हा दाखल करून त्याला निलंबित केले व अटक करण्यात आली आहे. हा व्यवसाय बऱ्याच महिन्यांपासून सुरू असल्याचे म्हटले जात आहे.या घटनेनंतर वनविभागामध्ये खळबळ उडाली असून असे आणखी कुठे प्रकार सुरु आहे का, याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग