शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबाच्या बफर क्षेत्रात गाणे वाजवणे पर्यटकांना पडले महागात; वनविभागाची कडक कारवाई

By राजेश भोजेकर | Updated: January 27, 2023 12:27 IST

ज्या परिसरात भरदिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो. अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाणे लावून पार्टी सुरू होती.

चंद्रपूर :  ताडोबाच्या बफर क्षेत्रात रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून गाणे वाजवून पार्टी करणे परराज्यातील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. या घटनेत वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर) संतोष थिपे यांनी अन्य राज्यातून आलेल्या वाहन चालकांकडून ५००० रुपये दंड वसूल करून लगेच जंगलाबाहेरचा रस्ता दाखविला.

जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली पद्मापुर मार्गाने जात असताना परराज्यातील पर्यटकांच्या दोन चारचाकी गाड्या ताडोबा बफर सफारीच्या रस्त्याखाली उतरून मोठ्याने गाणे लावून पार्टी करत असल्याचे तेथिल स्थानिक गाईड व ड्राइवरच्या लक्षात आले. त्यांनी मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती दिली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. ज्या परिसरात भरदिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो. अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाणे लावून पार्टी सुरू होती. याप्रकरणी ५ हजार रुपये दंड आकारून त्या पर्यटकांना जंगलाबाहेर काढले.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पtourismपर्यटनchandrapur-acचंद्रपूर