जयंत जेनेकर
कोरपना : तालुक्यात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी देवघाट नावचे गाव अस्तिवात होते. आज ते रिठ स्वरूपात उरले आहे. मात्र येथील पुरातन हनुमान मंदिर व नाल्याभोवती परिसरात पुरातन मुर्त्या दुर्लक्षित पडल्या आहे. त्यामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास व संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत इतिहास प्रेमींनी व्यक्त केले आहे.
देवघाट हे पूर्वापार काळापासून अगदी वैभव संपन्न गाव म्हणून प्रसिद्ध होते. परंतु गावात अज्ञात रोगाची लागण झाली आणि त्यात हे गाव लगतच्या लोणी, कुसळ आदीसह इतरत्र गावात स्थलांतर झाले. तेव्हापासून यास्थानी स्थिर वस्ती लाभली नाही. मात्र अनादी काळापासून या पुरातन मुर्त्या आजही भग्नावस्थेत पडल्या आहे. पकडीगुड्डम धरणापासून उगम पावणाऱ्या नाल्याला याच गावाच्या नावावरून देवघाट नाला असे नाव पडले असे जुने जाणते सांगतात. या नाल्याच्या पूर्व भागात पुरातन हनुमान मंदिर व पश्चिम भागात म्हणजेच दुसऱ्या गणेश मोड या रिठ स्वरूपात उरलेल्या गाव भागात श्री दत्त मंदिर आहे. येथील मूर्ती सुद्धा देवघाट नाल्यावर पूलाच्या निर्मितीदरम्यान सापडली. देवघाट रिठावर अनेक भगवान गणेश, शिव लिंग, आदीसह अनेक देवतांच्या मूर्ती आढळून येतात. परंतु यावर संशोधन झाले नसल्याने या मुर्त्या नेमक्या कोणत्या काळातील आहे. याबाबत आजही पुरावे उपलब्ध नाही. यामुळे भावी पिढीला हा इतिहास अवगत होण्यासाठी या परिसराचे संशोधन होणे गरजेचे आहे. याच प्रकारच्या काही मुर्त्या अंतरगाव, सिंगार पठार , मारोतीगुडा ( माणिकगड किल्ला परिसर ), नोकारी ( शिव मंदिर) लगत आढळून येतात.
बॉक्स
पुरातत्व विभागाकडे नोंद नाही
कोरपना तालुक्यात अनेक पुरातन वैभवशाली वारसा आहे. तोच जोपासल्या जाण्यासाठी याठिकाणी ऐतिहासिक संग्रहालय उभारावे. जेणेकरून भावी पिढीला या भागातील समृद्ध इतिहास कळण्यासाठी सोयीचे होईल. या माध्यमातून अभ्यासकांना माहिती उपलब्ध होईल. या स्थळाची माहिती पुरातत्व विभागाकडे नोंद नाही