शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

जिल्ह्यातील या इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स अन् कमाई आहे लाखांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:31 IST

सोशल मीडियातील स्टार : जिल्ह्यातच नव्हे तर देशात मिळाली ओळख

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : 'रोल कॅमेरा अँड अॅक्शन' म्हटले तर फक्त चित्रपटांपुरतेच आता मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक जण आता स्टार झाले आहेत. त्यातूनच महिन्याकाठी हजारोंची कमाईदेखील केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही असे इन्फ्लूएन्सर असून, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंत आणि उत्पन्न चाळीस ते पन्नास हजारांवर असल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर विनोदी रील्स तयार करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील आशिष बोबडे, तर गावरान भाषेत मनोरंजन करणारे चंद्रपूर तालुक्यातील नागाळा येथील प्रतीक वाढई यांची ओळख आता सातासमुद्रापार गेली आहे. यासह अनेक इन्फ्लूएन्सर्स सोशल मीडियावर मनोरंजक माहितीपूर्ण आणि प्रभावी कंटेंट शेअर करून फॉलोअर्सची मने जिंकत आहेत. यातून त्यांना महिन्याकाठी बरेच उत्पन्नही मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे इन्फ्लूएन्सर आपले फॉलोअर्स वाढविण्यासाठी दररोज नवनवे प्रकार रील्स, व्हिडीओ बनवून शेअर करत असल्याचे दिसून येत आहेत.

पोट धरून हसायला लावणारा आशिष बोबडेआशिष बोबडे हा मूळचा चिमूर येथील रहिवासी आहे. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्रम्प तात्यापासून तयार केलेला व्हिडीओ प्रेक्षकांनी उचलून धरला. तेव्हापासून तो सोशल मीडिया स्टार बनला आहे. महिन्याकाठी तो ६० ते ८० हजार रुपये कमवत आहे. 

आशिष बोबडे फॉलोवर्स इंस्टाग्राम - २,०१,८०० युट्युब - ४,०३,००० फेसबुक - ४,०२,१८० 

गावपण दाखवणारा प्रतीक वाढई प्रतीक वाढई हा चंद्रपूर तालुक्यातील नागाळा येथील आहे. गावरान भाषेत तो विविध विषयावर व्हिडीओ बनवत असतो. साडी घालून बनविलेले व्हिडीओ हे प्रेक्षकांना चांगलेच पसंत पडत आहेत. यातून त्याला महिन्याकाठी ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळत आहे.

प्रतीक वाढई फॉलोवर्सइंस्टाग्राम - २,८९,००० युट्युब - २६,००० फेसबुक - १८,००० 

हौशी कलावंतांना मिळाला वाव सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला प्रदर्शित करण्याची संधी हौशी कलावंतांना मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक कलावंत आपापल्या पद्धतीने रील्स अन् व्हिडीओ तयार करत आहेत. 

नवीन इन्फ्लूएन्सरना सल्ला "बालगोपालांपासून तरुणही सोशल मीडियाच्या मायाजाळात गुरफटत आहेत; परंतु पहिले विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करावे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या विषयात आवड आहे. त्यासंदर्भात व्हिडीओ तयार करू शकतात; मात्र कुणाच्या भावना दुखावतील किंवा बदनामी होईल, असे व्हिडीओ तयार करू नये." -आशिष बोबडे, चिमूर

"आपल्याला जी गोष्ट आवडते. ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, लोक काय म्हणतील याचा विचार करु नका. आपल्याला जे साध्य करायचे आहे. त्यासाठी कठोर परिश्रम करा." -प्रतीक वाढई, नागाळा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSocial Mediaसोशल मीडिया