शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांना पूर, शेकडो गावात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

चंद्रपूरसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे.  गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वेग धरलेल्या पावसाने दुपारी १.३० वाजपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सर्व वस्त्या जलमय झाल्या. रामनगर ते बिनगेट मार्गावरील अनेकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील मुख्य वस्ती, तुकूम, बाबूपेठ, बंगाली कॅम्प या परिसरातही अशीच स्थिती होती. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरही जलमय झाला.

ठळक मुद्देचंद्रपुरात सिमेंट नाली बांधकामांची पोलखोलवर्दळीचे रस्ते झाले जलमयमुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसानशेकडो हेक्टर शेती पाण्याखालीपुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाची बुधवारपासून झळ सुरू झाली. गुरुवारी पावसाने वेग धरून मुसळधार बरसल्याने नदी, नाले फुगले तर अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद झाल्याने नागरिक अडकले. वाहतूक ठप्प झाली. पावसाने धुवाधार झोडपल्याने चंद्रपुरातील वर्दळीच्या मार्गावर तर जणू नदी अवतरल्याचे दिसून आले. जनजीवन विस्कळीत झाले. गुरुवार जिल्ह्यात २४ तासात ४४७.७. मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.चंद्रपूरसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे.  गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वेग धरलेल्या पावसाने दुपारी १.३० वाजपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सर्व वस्त्या जलमय झाल्या. रामनगर ते बिनगेट मार्गावरील अनेकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील मुख्य वस्ती, तुकूम, बाबूपेठ, बंगाली कॅम्प या परिसरातही अशीच स्थिती होती. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरही जलमय झाला.

लाल नाला प्रकल्पाचे सहा गेट उघडले पावसामुळे लाल नाला प्रकल्पाचे सहा गेट उघडण्यात आले. गोसीखुर्द धरणातून १६० क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. पावसामुळे आज दुपारी २ वाजतापासून जल विसर्गाची पातळी ५०० क्युमेक्सपर्यंत वाढविण्यात आली. नदीकाठावरील गावांनी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

सर्व तालुक्यांत पावसाची झळसोयाबीन व कपाशीच्या पेरण्या आटोपल्या. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. मात्र, जुलै महिन्यातील दोन आठवडे कोरडे गेल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली. पऱ्हे रोवणीच्या स्थिती असूनही पाऊस नव्हता.  बुधवारपासून सर्वच तालुक्यात झड सुरू आहे. झडीच्या पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. त्यामुळे धान उत्पादक तालुक्यात रोवणीला वेग येण्याची शक्यता आहे.

शेतकरी दुचाकीसह वाहून गेलाराजुरा : भेदोडा येथील चंदू बिल्लावार (५५) हा शेतकरी गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुरात आपल्या दुचाकीसह वाहून गेला. ही घटना गुरुवारी घडली. चंदू हा गावाकडे दुचाकीने जात होता. भेदोडा नाल्याला पूर असतानाही त्याने आपली दुचाकी पाण्यात टाकली आणि पुरात दुचाकीसह वाहून गेला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून शोध घेणे सुरू आहे. या शेतकऱ्याचे कृषी केंद्र आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर