शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट नाही म्हणून भरला 38 लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे.  वाहतूक नियमांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तरीसुद्धा अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन स्वत:सह इतराचा जीव धोक्यात घालतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहनाच्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करुनच वाहन चालवावे, याबाबत वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीसुद्धा अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवित असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांनी वर्षभरात तीन कोटी १४ लाख ५७ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक नियमांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तरीसुद्धा अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन स्वत:सह इतराचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मट, विनापरवाना, ट्रीपलसीट, मोबाईलवर बोलणे आदी विविध वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी अलीकडेच सुरु झालेली आहे. यादरम्यान         वाहनचालक तीनदा विनाहेल्मेट आढळून आल्यास चक्क परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकाला मोठे महागात पडणार आहे. 

नवीन कायद्याची अंमलबजावणीकेंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात अलीकडेच सुरु झाली आहे. या कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तीनदा विनाहेल्मेट आढळून आल्यास परवानाच रद्द होणार आहे.

लॉकडाऊनमुळे दंडवसुली घटली कोरोनामुळे मागील दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणे बंद होते. त्यामुळे दंडवसुली घटली होती. मात्र पुन्हा कारवाई सुरु केली आहे.

नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास दंडाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार नाही. आता नव्या मोटार वाहन कायद्याची अमंलबजावणी सुरु झाल्याने दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. परवाना रद्दसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालवावे.-प्रवीणकुमार पाटील, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस