शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:18 IST

सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

ठळक मुद्देईएलसीबी उपकरणाची सक्ती : नव्या नियमामुळे वीज ग्राहक वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.विद्युत निरीक्षक मंडळाने याबाबत सूचना निर्गमित केल्याने आर्थिक भुर्दंड सोसून ईएलसीबी लावणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनिमय २०१० च्या क्र. ४२ प्रमाणे सिंगल फेज व थ्री फेज नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ईएलसीबी जोडणी करारनामा असणे अनिवार्य केल्याने ग्राहक अडचणीत सापडले आहेत.ए वन फॉर्मसोबत जोडण्यात आलेल्या विद्युत कंत्राटदाराच्या चाचणी अहवालात वीज दाबाला अनुसरून योग्य क्षमतेची ईएलसीबी लावल्याचा उल्लेख असणे आवश्यक केले आहे.नवीन विद्युत कनेक्शन घेताना यापूर्वी ईएलसीबीची आवश्यकता नसल्याने सरसकट विद्युत कनेक्शन दिले जात होते. मात्र केंद्रीय विद्युत प्राधिकरण मंडळाने याबाबत सबंधित विद्युत मंडळाच्या विभाग व उपविभागांना पत्र पाठवून ईएलसीबीशिवाय नवीन कनेक्शन न देण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसून ईएलसीबी लावणे अत्यावश्यक झाले आहे.ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय घेतल्याचे विद्युत कंपनीचे म्हणणे असले तरी आर्थिक भार ग्राहकांना सोसावा लागणार असल्याने नाराजीचा सूर दिसत आहे. ग्राहकांचा हिताच्या दृष्टीने विद्युत कंपनी कार्य करीत नसून महागाईच्या काळात आर्थिक झळ पोहचविण्याचे काम कंपनी करीत असल्याचा आरोप केला जात आहे.कपंनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवित असल्याचा आरोप केला जात आहे. वीज वितरण कंपनीने ईएलसीबीची अट रद्द करण्याची मागणी आहे.ग्राहकांचे हित लक्षात घेऊ न ईएलसीबीची नवीन कनेक्शनसाठी अट घातली आहे. घरात केलेली फिटींगमध्ये ४ ते ५ वर्षांनी बदल होत असल्याने वायरिंग फाल्ट अथवा अर्थिंगचा धोका कायम असतो. अनवधनाने काही अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईएलसीबीने काही बिघाड असेल तर तो त्वरित कळतो. आणि धोका टाळला जाऊ शकतो. कंपनीने केलेली ईएलसीबीची सक्ती ग्राहकांच्या हितासाठीच आहे.-चंदन चौरसिया,उपकार्यकारी अभियंता,म. रा. वि. कंपनी, उपविभागीय मूल