शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘ती’ वाघीण जेरबंद; पाच महिन्यांपासून सुरू होता धुमाकूळ

By परिमल डोहणे | Updated: May 27, 2023 18:56 IST

Chandrapur News मागील पाच महिन्यांपासून सावली तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला वनपरिक्षेत्र कार्यालय सावली अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ११४ मध्ये बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

परिमल डोहणे 

चंद्रपूर : मागील पाच महिन्यांपासून सावली तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला वनपरिक्षेत्र कार्यालय सावली अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ११४ मध्ये बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह वन विभागानेही सुटकेचा निःश्वास सोडला. त्या वाघिणीला पकडण्यासाठी जवळपास ७०

ट्रॅप कॅमेरे व शंभरपेक्षा अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्या वाघिणीला नागपूरच्या गोरेवाडा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहे.ही कारवाई चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक निकिता चौरे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक आदेश शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरूडे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण विरूटकर, संरक्षण पथकाचे प्रमुख डॉ. कुंदन पोडचलवार, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे, व्याहाड खुर्दचे आर. एम. सूर्यवंशी, पेंढरीचे अनिल मेश्राम, पाथरीचे एन. बी. पाटील यांच्यासह सर्व वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यात प्रामुख्याने पशुधन विकास अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व शूटर अजय मराठे यांनी मोलाची भूमिका ठरली.बॉक्स

चार जणांचा घेतला होता बळीसावली तालुक्यातील बोरमाळा, चक विरखल, वाघोली बुटी या परिसरात धुमाकूळ घातला होता. ३० मार्चला बोरमाळा येथील हर्षल काळमेघे या चार वर्षीय बालक घराशेजारी शौचाला बसला होता. तेव्हा वाघिणीने त्याला उचलून नेत ठार केले. १८ एप्रिल रोजी चक विरखल येथील मंदाबाई सिडाम हिला ठार केले होते. २६ एप्रिल रोजी ममता बोदलकर या वृद्ध महिलेस ठार केले होते. तर, उपवन क्षेत्र व्याहा खुर्द अंतर्गत वाघोली येथील प्रेमिला रोहनकर हिच्यावरही वाघाने हल्ला केला होता.

टॅग्स :Tigerवाघ