शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाविरूद्धची लढाई अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व नागरिक तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत. सोबतच त्यांना दिल्ली सोडून १४ दिवसांवर कालावधी झाला आहे. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन केल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिली.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची माहिती : मशिदीतून ताब्यात घेतलेल्या ११ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या लढाईमध्ये अंतिम टप्प्यात आपण आलो असून नागरिकांनी घराबाहेर पडून जीव धोक्यात घालू नये. जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढायची असून त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व नागरिक तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत. सोबतच त्यांना दिल्ली सोडून १४ दिवसांवर कालावधी झाला आहे. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन केल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिली. घरातील सुदृढ असणाऱ्या एकाच व्यक्तीला पुढील आठवडाभर एकदाच बाहेर पडावे लागेल असे नियोजन करावे व सामाजिक अंतर राखावे. जिल्ह्यामध्ये कोणी येणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात राबविला जात आहे. चंद्रपूरमध्ये जे कुणी अडकून पडले असेल किंवा ज्यांना बाहेर जायचे असेल त्यांनीही पुढील १४ तारखेपर्यंत संयम पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.मोफत धान्य वितरणाला सुरूवातअंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या शिधापत्रिकाधारकांना नियमित मिळणाºया धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत ५ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेताना गडबड होणार नाही याची काळजी घ्यावी. शुक्रवारी योजनेचा शुभारंभ चंद्र्रपूर शहरातून करण्यात आला आहे. रेशनकार्ड वर मिळणाºया अन्य अन्नधान्यासाठी २ व ३ रुपये दराने खरेदी करता येणार आहे. मात्र तांदूळ हा मोफत मिळत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.विदेशातील २८ जणांवर अद्याप निगराणीजिल्ह्यांमध्ये आतापर्यंत विदेशात जाऊन आलेल्या २०४ प्रवाशांची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यापैकी १४ दिवसांच्या निगराणीत असणाºया प्रवाशांची संख्या २८ तर १४ दिवसांची तपासणी करण्यात आलेल्या विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १७६ आहे.१४ एप्रिलपर्यंत चंद्रपूर अप-डाऊन बंद करण्याचे निर्देशखबरदारी म्हणून शनिवारपासून चंद्रपुरातून एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही आणि बाहेरून एकही व्यक्ती चंद्रपूर शहरात येणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी दिले. लॉकडाउन लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनाश्यक वस्तुंसाठी अडचणी येऊ नये, याकरिता प्रशासनाने उपाययोजना केल्या. त्यामुळे विनाकारण बाहेर निघण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.५ हजार २९८ नागरिक निवारा केंद्रातजिल्ह्यात ५ हजारपेक्षा अधिक नागरिक शेल्टर होममध्ये आश्रयाला आहेत. या सर्र्वांना व्यवस्थित खानपान मिळावे व कोणत्याही तक्रार राहू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा शेल्टर होम वाढविण्यात येणार आहेत.यंग चांदा ब्रिगेडकडून निरंतर भोजनसेवाचंद्रपूर : लॉकडाउन लागू झाल्याने शेकडो कामगारांना संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून १० हजार गरजूंपर्यत भोजनाचा डब्बा पोहचवला जात आहे. यात सामाजिक संस्थाही सक्रिय झाल्या आहेत.गणेशपुरातील मजूर अडकलेदेवाडा बु. : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बू तसेच गणेशपूर येथील मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी ते मिरची तोडण्याकरिता तेलंगणा राज्यात गेले होते. मात्र, लॉकडाउनमुळे स्वगावी येऊ शकले नाहीत. त्यामुळे भोजन व निवासाच्या दृष्टीने बेहाल सुरू असल्याची माहिती त्यांनी कुटुंबीयांनी दिली.२७ मजुरांना रैन बसेरात आश्रयसावली : तेलंगणा राज्यातून रोजगारासाठी जाऊन परत येणाºया २७ मजुरांना येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या रैन बसेरात आश्रय देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सूरमवार व लोकसहभागातून भोजनाची व्यवस्था केली जात आहे. २७ पैकी १४ गोंदिया, १० गडचिरोली व ३ मजूर चंद्र्रपूर जिल्ह्यातील आहे. सर्व मजुरांना ग्रामीण रूग्णालयात तपासणीकरिता नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधीक्षक एक तास उशिरा आल्याने मजुरांना ताटकळत राहावे लागले.व्यावसायिकावर कारवाईभद्रावती : संचारबंदीच्या काळात शासनाचे नियमाचे पालन न करता दुकान सुरू ठेवल्याने लोणारा येथील व्यावसायिकाविरूद्ध गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एकनाथ नांदे असे आरोपीचे नाव आहे. नागरिकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.धानोरकर दाम्पत्याकडून ३ हजार नागरिकांना देणार भोजनचंद्र्रपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकसभा क्षेत्रातील ३ हजार गरजूंना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शुक्रवारी वरोरा तालुक्यातून सुरूवात झाली. शनिवारपासून लोकसभा क्षेत्रात आवश्यक सर्व ठिकाणी भोजन वितरित होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस