शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

मूल महामार्ग बांधणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करूनदेखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : अपघातासाठी कंत्राटदाराला दोषी ठरविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वारंवार सूचना देऊनही प्रलंबित कामे पूर्ण होत नसेल, तर मूल हायवेवरील अपघातासाठी यापुढे संबंधित कंत्राटदाराला दोषी पकडण्यात यावे. या संदर्भातील तक्रारी संबंधित पोलीस विभागाला देण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी दिले.मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करूनदेखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मूल महामार्गाच्या कामाला तातडीने पूर्ण करण्यात यावे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.मूल हायवेवर अनेक ठिकाणी खासगी बांधकाम सुरू असून या बांधकामांना तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यात येऊ नये याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी बजावले आहे. त्यानंतर सदर मार्गाची पाहणी केली. महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने यासंदर्भात कारवाई करून बांधकाम साहित्य रस्त्यावर न टाकण्याचे निर्देश द्यावेत. कारवाई करावी, असेही त्यांनी आज स्पष्ट केले.या बैठकीला मुख्य अभियंता सुषमा सुरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, महानगर पालिकेचे शहर अभियंता महेश बारई, अभियंता मत्ते, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यादव आदींची उपस्थिती होती.८० टक्के पीक पंचनामे पूर्णपरतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पंचनामाला बुधवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहे. तालुक्यातील विविध शिवारात भेटी देऊन त्यांनी झालेल्या नुकसानाची मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यामध्ये अवकाळी व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यांची पिके काढण्यात आलेली नव्हती व नुकसान झालेले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी विभागाकडून केल्या जात आहेत. कृषी विभागाने सोमपर्यंत ७० टक्के पंचनामे पूर्ण केले होते. उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बुधवारपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्यात यावे व अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील यांना देण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत राज्यातील सर्व ठिकाणचे पंचनामे तयार होणार आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी