शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचा वेतनासाठी लढा

By admin | Updated: November 30, 2014 23:01 IST

२००१ पासून कायम-विनाअनुदानित तत्वावर व त्यानंतर आता विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आजही वेतनापासून वंचित आहेत. शासनाने शाळांची खैरात वाटली.

नांदाफाटा : २००१ पासून कायम-विनाअनुदानित तत्वावर व त्यानंतर आता विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आजही वेतनापासून वंचित आहेत. शासनाने शाळांची खैरात वाटली. त्यानंतर अनुदान मिळेल, या आशेने शिक्षक काम करीत आहेत. मात्र, सेवेचे १४ वर्षे उलटूनही वेतन सुरू झाले नसल्याने शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्यात जवळपास चार हजार प्राथमिक व माध्यमिक शाळा असून यात उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. त्यात साधारणत: २० हजाराहून अधिक कर्मचारी काम करीत आहे. मध्यल्या काळात शाळांचा कायम शब्द काढल्याने शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर शासनाने जाचक अटी पुढे करुन शाळांचे मूल्यांकन केले. यात राज्यातील १३०० शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले. मात्र, पाच ते सहा महिने लोटूनही पात्र शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. आजमितीला अनेक शिक्षक वयोमर्यादा पार करण्याच्या वळणावर आहे. त्यांचे विवाह होऊन १० ते १५ वर्ष उलटले. अशातच कुटुंबाचा भार वाहताना त्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.शासनाने मूल्यांकन करुन ज्या शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविले आहे, त्या शाळांचे पुर्नमूल्यांकन करण्यात येणार असल्याचे विधान नवनियुक्त शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांनी केले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांपुढे चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. गेल्या १४ वर्षांपासून विनावेतन ज्ञार्नाजनाचे काम करणारे शिक्षक हजारो विद्यार्थ्यांना संस्कारीत करीत आहेत. मात्र, त्यांच्या पोटाची खळगी भरली जात नसल्याने वेतनाच्या आशेवर जगावे लागत आहेत. याआधी राज्य विना-अनुदानित कृती समितीने मुंबई येथे आंदोलन केले. यामध्ये शाळांच्या मुल्यांकनाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे शासनाने शिथीलता दाखवून शाळांना अनुदानाची घोषणा केली. परंतु, आता वेतनच मिळत नसल्याने शिक्षकांपुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या शाळांना त्वरीत अनुदान द्यावे या मागणीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार हंसराज अहीर यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. शासनाने विना अनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. आता सरकारच्या भूमीकेकडे संघटनेचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)