ऑनलाईन लोकमतभद्रावती: शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांचे प्रश्न फार छोटे असूनही लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही. कापसाला पाणी नाही. पण, ऊस लावण्याचा सल्ला दिला जातो़ शेतकरी आपल्याला जगवितो़ आता त्याचेच जगणे कठीण झाले, असे मत सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले़ बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ आमदार बाळू धानोरकर आणि शिक्षक सेनेच्या वतीने आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते़याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, सतिश भिवगडे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू न. प. उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, तहसीलदार शितोळे, ठाणेदार बी मडावी, निबंध स्पर्धा प्रकल्प अधिकारी नंदकिशोर धानोरकर, राजू चिकटे, वासुदेव ठाकरे, भास्कर ताजने, कविश्वर शेंडे, किशोर हेपट, नफिस हलपी, व्ही. राठोड उपस्थित होते.अनासपुरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा ही काळाची गरज आहे. एक शेतकरी म्हणून आमचेही जगन मान्य करा, असेही त्यांनी नमूद केले़ निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यानिमित्त उलट-सुलट हा नाट्यप्रयोगही सादर करण्यात आला़ शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अनासपुरे यांनी भूमिका मांडली़ शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस धोरण आखणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत १ हजार १३४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, एक धगधगता अंगार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणे व शिवसेना महाराष्टÑाची गरज आदी विषयांवर ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती़स्पर्धेतील प्रथम पुरस्कार टेमुर्डा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयातील सूरज भुते या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला़ विवेकानंद महाविद्यालयातील उज्वला उज्वला नागपूरे द्वितीय, तर तृतीय पुरस्कार तृप्ती आगलावे हिने पटकाविला़ २० स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले़ ित्यामध्ये दीक्षा कांबळे, वैशाली पडवे, निकिता धोबे, प्रभाकर चिंचोळकर, निलम सागुळले, नम्रता जोगी, अश्विनी धोटे, सत्यवान निखाडे, प्राजक्ता देठे, प्राजक्ता जुमनाके, स्नेहा बलकी, शबिना शेख, प्रफुल चामाटे, मेबा वाकडे, वैष्णवी सातपुते, वैशाली ढगे, सलोनी फुलमाळी, निकिता कडाम, वैशाली डहाके, श्वेता देशकर आदींचा समावेश आहे.आमदार धानोरकर म्हणाले, ग्रामीण भागातील भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा असते़ मात्र, संधी मिळणे गरजेचे आहे़ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घटनांविषयी आजची पिढी जागरूक असल्याचे या स्पर्धेतून दिसून आले़शेतकºयांच्या समस्या आजही कायम असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली़ नाट्यप्रयोगाला तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला़हा नाट्यप्रयोग नि:शुल्क ठेवण्यात आला होता़ संचालन प्रा. सचिन सरपटवार यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना, शिक्षक सेनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते़
शेतकऱ्यांचे जगणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:08 IST
शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांचे प्रश्न फार छोटे असूनही लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही. कापसाला पाणी नाही. पण, ऊस लावण्याचा सल्ला दिला जातो़ शेतकरी आपल्याला जगवितो़ आता त्याचेच जगणे कठीण झाले,....
शेतकऱ्यांचे जगणे झाले कठीण
ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण