शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By admin | Updated: August 27, 2016 00:30 IST

गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळात नसल्याने अखेर तालुक्यातील पाच गावातील हजारो शेतकऱ्यांनी ...

गडचिरोली-नागपूर मार्ग रोखला : दोन तास वाहतूक ठप्पब्रह्मपुरी : गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळात नसल्याने अखेर तालुक्यातील पाच गावातील हजारो शेतकऱ्यांनी नागपूर-गडचिरोली राज्य मार्गावर किन्ही गावाजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजता रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरल्याने अखेर प्रशासनाला मध्यस्ती करावी लागली. गोसीखुर्दच्या पाण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असे वृत्त गुरुवारी लोकमतने प्रकाशित केले होते. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांनी रस्ता रोको करून रोष व्यक्त केला. गोसीखुर्द कालवा बी-३ कालवा किन्ही या गावाजवळ गट क्र. १३९ मध्ये ६० मीटरचे काम मागील वर्षापासून बंद आहे. खरकाडा, निलज, रुई, पाचगाव, रणमोचन, पिंपळगाव इतर गावातील ५ हजार ७३९ हेक्टर आर पैकी ३४४ हेक्टर शेतजमिनीला हे पाणी मिळणार होते. परंतु ६० मीटर जमिनीच्या मालकाने अडवणूक केल्याने पाण्यापासून शेतकरी वंचित होते. या संदर्भात शेतकऱ्यांनी गोसीखुर्द विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी ही गंभीर बाब लक्षात आणून दिली. पण काही तोडगा न निघाल्याने शुक्रवारी दुपारी मनसे जिल्हाउपाध्यक्ष आनंद बावणे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नानाजी तुपट यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी राज्य मार्गावर आडवा ट्रक लावून दोन तास वाहतूक रोखून धरली. शेवटी तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार राठोड, गोसिखुर्द कालव्याचे सहा. अभियंता जितेंद्र मडावी, पोलीस निरीक्षक ओ.बी. अंबाडकर यांच्या मध्यस्थितीने तोडगा काढून दोन तासानंतर वाहतूक सुरू झाली. यावेळी रणमोचनचे सरपंच मंगेश दोनाडकर, खरकाडाचे सरपंच वंदना खरकाटे, उपसरपंच तारकेश्वर तोंडरे, रविंद्र ढोरे, योगेश ढोरे व पाच गावातील हजारो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)पाण्यासाठी प्रसंगीमरण्याची तयारीजमावकर्त्यांनी रस्ता रोखून गडचिरोली व नागपूरला जाणारी असंख्य वाहने अडवून ठेवली. त्यामागे त्यांच्या शेतीतील धान पिके करपायला लागली असल्याने हा रोष व्यक्त करण्यात आला. जर या दोन-तीन दिवसात धानाला पाणी मिळाले नाही तर प्रसंगी आम्ही मरणासही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रखडलेले बांधकाम सोमवारपासून सुरू करण्याची लेखी हमी दिली आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवून काम पूर्ण करण्यात येईल.- जितेंद्र मडावीसहा. अभियंता, गोसीखुर्द विभाग.