शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

धान विक्रीसाठी शेतकऱ्याची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

खरेदी करणाऱ्या कार्यालयात फक्त खरेदीचा फलकच लावला आहे. विशेष म्हणजे, सदर कार्यालय रोजच बंद असते. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या पावली परत यावे लागत आहे. काही शेतकरी हे ज्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत, ते केंद्रप्रमुख सुरेश भसारकर यांना भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता गोदाम भरून आह.े त्यामुळे धान खरेदी करू शकत नाही, असे उडवाउडवीचे उतर देत आहेत.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळाला निवेदन : धान खरेदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत मागील दोन महिन्यांपासून धान खरेदी सुरु आहे. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांचे धान घेण्यात आले व उर्वरित शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी पायपीट सुरु असून धान खरेदी तत्काळ करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.या संदर्भातील निवेदन आदिवासी विकास महामंडळ उपविभाग गोंडपिपरी व व्यवस्थापक सहकारी संस्था करंजी यांना देण्यात आले आहे. राज्य सरकारने धानाला १८१५ रुपये हमीभाव जाहीर केला व बोनस ७०० रुपये केला. मात्र या तुलनेत अन्य ठिकाणी धानाचे भाव कमी असल्याने करंजी आदिवासी विविध सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी सुरु असल्याने या संस्थे अंतर्गत येत असलेले करंजी, आक्सापूर, जोगापूर, धानापुर, गणपूर, कन्हाळगाव या गावातील शेतकरी रोजच करंजी येथे जाऊन धान विक्रीसाठी विचारणा करण्याकरिता जात आहेत. मात्र खरेदी करणाऱ्या कार्यालयात फक्त खरेदीचा फलकच लावला आहे. विशेष म्हणजे, सदर कार्यालय रोजच बंद असते. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या पावली परत यावे लागत आहे. काही शेतकरी हे ज्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत, ते केंद्रप्रमुख सुरेश भसारकर यांना भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता गोदाम भरून आह.े त्यामुळे धान खरेदी करू शकत नाही, असे उडवाउडवीचे उतर देत आहेत. परंतु वास्तविकता बघितल्यास करंजी संस्थे मार्फत येणाऱ्या गावात फक्त मोजक्याच लोकांचे धान खरेदी केल्याने गोदाम भरलाच कसा व या परिसरात बारीक धान पिकत असल्याने जाड धान आले कुठून, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जाड धान खरेदी करून रातोरात गोदाम भरल्याचा आरोप शेतकरी करीत असून तसा आरोपसुद्धा आदिवासी विकास महामंडळ उपविभाग गोंडपिपरी व व्यवस्थापक आदिवासी विविध सहकारी संस्था करंजी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.करंजी संस्थेसह माझ्याकडे चार सहकारी संस्थेचा प्रभार आहे. त्यामुळे करंजी आदिवासी सहकारी संस्थेचे लिपिक सुरेश भसारकर यांना केंद्रप्रमुख म्हणून धान खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले. धान खरेदी करत नसल्याची माझ्याकडे शेतकºयांची तक्रार प्राप्त झाली असून पुढील कारवाई सुरू असून धान खरेदी लवकरच सुरू करण्यात येईल.- विश्वनाथ आलाम, व्यवस्थापक, आदिवासी विविध कार्य, सहकारी संस्था, करंजी.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड