शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

निवडणुकीच्या काळात महाडीबीटी नोंदणीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने आता महा़डीबीटी पोर्टवर शेतकरी योजना सुरु केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व ...

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने आता महा़डीबीटी पोर्टवर शेतकरी योजना सुरु केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्ज करण्यापासून तर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाहिजे तसा प्रतिसाद नसून ग्रामीण भागातील शेतकरी सध्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये गुंतले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ६२९ गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. त्यामुळे या रणधुमाळीत ग्रामीण भागातील शेतकरी सध्या गुंतले असून त्यांना अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे, योजने संदर्भात आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना यासंदर्भात माहितीच नसल्याचे चित्र आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही. आधार लिंक नसल्याने अर्ज भरताना अडचणीही येत आहे. त्यामुळे कंटाळून अनेक शेतकरी अर्ज भरत नसल्याचेही चित्र आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुुरु करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर इच्छुक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्यांना नोंदणी करता येते.

या योजनांसाठी आता एकच अर्ज

एका क्लिकवर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिचंन योजना, मुख्यमंत्री कृषी शाश्वत कृषी सिंचन योजना, अन्न सुरक्षा अभियान, बिरडा मुंडा कृषी क्रांती योजना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आदी योजनांचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांना पसंतीनुसार निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

अशी करावी लागते नोंदणी

शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आधाड कार्डशी संलग्न करून महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल अथवा संगणकाद्वारे सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी आवाहन

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका क्लिकवर अनेक योजनांचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

---

असे जोडावे लागणार कागदपत्रे

३१ डिसेंबर ही नोंदणी करण्याची अखेरची मुदत आहे. त्यानंतर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, आठ अ, खरेदी करावयाच्या कृषी अवजाराचे कोटेशन, मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयंघोषणापत्र, पूर्व संमतीपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

---

कोट

शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. परंतु यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज कसा करावा यासाठी शेतकऱ्यांना माहिती नाही. केंद्रावर जावून अर्ज करण्यासाठी पैसा लागत असून शेतीकाम सोडून आणि पैसा खर्च करून अर्ज भरावा लागत आहे.

-पवन वाघमारे

शेतकरी, चंद्रपूर

--