शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बजावली कंपनी प्रशासनाला नोटीस; ८७ शेतकऱ्यांना मिळाला नाही मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 14:31 IST

Chandrapur : ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापकासोबतच जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी आदींना बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पंतप्रधान पीकविमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामाची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापक, केंद्रीय व राज्य कृषी विभाग सचिव, जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी आदींना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती अॅड. दीपक चटप यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत मागील हंगामात एक रुपयात विमा काढला होता. कंपन्यांना जाणार प्रीमियम हा जनतेच्या पैशातून शासन भरत असतो. मात्र, नुकसान झाल्यानंतर वेळेत विमा कवच मिळत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

ओरिएंटल विमा कंपनीच्या जुलै २०२४ च्या पत्रानुसार विमा कंपन्यांनी पात्र ठरवलेल्या जिल्ह्यातील ८७ हजार ७४२ शेतकऱ्यांचे १३३ कोटी ९८ लाख ५६ हजार ३८६ रुपये अद्यापही मिळालेले नाही. विमा क्लेम करूनही कंपनीने पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांनाही १५ दिवसांच्या आत भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी गजानन लोडे, किशोर डुकरे, शब्बीर सय्यद, नरेश सातपुते, सुनीता शेंबाळे, परमेश्वर वारे, अविनाश डोहे, सत्यशीला हरबडे, वामन ढेंगळे, प्रभाकर कारेकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कायदेशीर नोटीस बजावून केली आहे.

पिक विमा योजना"चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न करताच मदतीपासून अपात्र ठरविले. २०२३ पासून प्रतीक्षेत असणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू."-अॅड. दीपक चटप, उच्च न्यायालय, नागपूर 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाfarmingशेतीFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर