शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो ३० जून पर्यंत 'केवायसी' करा; अभावी पैशे शासनाकडे परत जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 16:30 IST

Chandrapur : वर्ष लोटूनही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित; 'केवायसी' अभावी २०३२ शेतकऱ्यांची आर्थिक मदत थांबली

बी. यू. बोर्डेवारलोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : मागील वर्षी जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाले. शासनातर्फे दिले जाणारी आर्थिक मदत अनेक शेतकऱ्यांचे बँक खात्याची 'केवायसी' झाली नसल्यामुळे जमा झालेले नाही. यात राजुरा तालुक्यातील केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन हजार ३२ एवढी आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आलेले लाखो रुपये 'केवायसी' अभावी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत केवायसी करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे.

मागील खरीप हंगामामध्ये जुलै ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे नदी व नाल्याकिनारी असणाऱ्या शेतीचे फार मोठे नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आल्यामुळे उभी पिके नष्ट झालेली होती.

यात नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. याबाबत महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केलेले होते. तालुक्यात पाच हजार ७६५ लाभार्थ्यांना शासनातर्फे आर्थिक लाभ मिळणार होता. गाळ साचून, जमीन खरवडून व अतिपावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने त्यांना हेक्टरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्याअनुषंगाने ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला थेट जमा होणार होती. यामध्ये आतापर्यंत दोन हजार ५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा झाली आहे, तर एक हजार ४७८ शेतकऱ्यांचे केवायसी प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर काही दिवसांत रक्कम जमा होणार आहे; मात्र अजूनही तब्बल दोन हजार ३२ लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यांचे केवायसी नसल्यामुळे लाखो रुपयांची रक्कम ही शासनाकडे अजूनही जमा आहे. काही कालावधीनंतर ही रक्कम शासनाला जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाने संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी तत्काळ केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. 

तांत्रिक अडचणीच्या नावावर तब्बल वर्षभरानंतर अजूनही शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे अनेक शेतकरी हतबल आहेत. जेमतेम आर्थिक मदत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असताना तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे ते त्रस्त झाले आहेत.

संमतीपत्र नसलेल्यांनाही मदत नाहीयाशिवाय सामायिक खातेदारांचे संमतीपत्र नसल्यामुळेही शासनाकडून मिळणारी रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची माहिती आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढवले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी झालेली आहे, तर दुसरीकडे मागील वर्षीच्या नैसर्गिक आपत्तीत झालेले नुकसानभरपाईसुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशा आर्थिक संकटात बळीराजा सापडल्या असल्याने आता 'केवायसी'चे नवीन संकट त्यांच्यासमोर उभे आहे.

तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी जुलै, ऑगस्ट २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वाटप प्रक्रिया शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन डीबीटी पोर्टलद्वारे सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील २२५५ शेतकरी बांधवांना अनुदान रक्कम प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा झाली असून १४७८ शेतकरी बांधवांचे ई-केवायसी झाली असून लवकरच रक्कम खात्यामध्ये जमा होईल.- डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार, राजुरा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर