शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचे स्वयंचलित कुक्कुट पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:39 IST

सर्वच क्षेत्रात मनुष्य बळाचा वापर कमी केलाा जात आहे. काही क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्घ होत नाही, अशा ठिकाणी स्वयंचलित यंत्र लावून व्यवसाय थटला जातो. अशातच एका शेतकऱ्याने शेतात स्वयंचलित कुक्कुट पालन प्लॅन्ट उभारला आहे. अशा प्रकारचा हा प्लान्ट चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला असल्याचे मानले जात आहे.

ठळक मुद्देअनेकांसाठी प्रेरणादायी : चारा-पाणी स्वयंचलित यंत्राद्वारे

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सर्वच क्षेत्रात मनुष्य बळाचा वापर कमी केलाा जात आहे. काही क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्घ होत नाही, अशा ठिकाणी स्वयंचलित यंत्र लावून व्यवसाय थटला जातो. अशातच एका शेतकऱ्याने शेतात स्वयंचलित कुक्कुट पालन प्लॅन्ट उभारला आहे. अशा प्रकारचा हा प्लान्ट चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला असल्याचे मानले जात आहे.कुक्कुट पालन व्यवसाय करीत असताना सुलभ नियोजन करावे लागते. त्यातील महत्वाचा घटक स्वच्छता, पाणी, खाद्य, औषधी तसेच वातावरणात संयम ठेवला जातो. याकरिता प्रशिक्षित मजूर ग्रामीण भागात मिळणे दुरापास्त असते. त्यामुळे वरोरा शहरापासून काही अंतरावर राहुल विधाते या शेतकऱ्याने पोल्ट्री फार्म उभारला. हा व्यवसाय संपूर्णपणे मजुरांकडून केला जात असलयाने त्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागत होता. सध्या त्यांनी २२० मीटर लांब व ४० मीटर रूंद या आकरात शेडची उभारणी केली आहे. सध्या या शेडमध्ये दहा हजार कोंबडीचे पिल्ले आहेत. या पिलांना चारा, औषधी, पाणी स्वयंचलित यंत्राद्वारे देण्यात येत आहे. पिल्ले असलेल्या ठिकाणी धानाचा कोंडा खाली टाकण्यात आला असून पिल्लाची विष्ठा त्या कोंड्यात मिसळत असल्याने घाण होत नाही. खाद्याचे व पाण्याचे भांडे भरले तर स्वयंचलित यंत्र आपोआप बंद होते. या शेडमध्ये तीन मोठे कुलर लावण्यात आले असून एक जनरेटरही आहे. स्वयंचलित यंत्रामध्ये बिघाड आल्यास सायरन वाजत असतो व संचालकांच्या भ्रमणध्वनीवर मॅसेज येत असल्याने तात्काळ दुरूस्ती केली जाते. सुरक्षेकरीता संपूर्ण प्लान्टला जाळी लावण्यात आली आहे. आतमध्ये जाताना दारानजिक पाण्याचे टाके आहे. त्यात पाय धुवून जावे लागते. ३० ते ३५ दिवसात पिल्लाचे वजन दोन ते अडीच किलो होत असून छत्तीसगडमधील कंपनी पिल्ले व खाद्य पुरविते. विधाते यांचा हा जोडधंदा इतर शेतकºयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.मेंटनन्स चांगले केल्यास नफा निश्चितच मिळतो. स्वयंचलित प्लान्टमुळे आपणाला मोठा फायदा होत आहे.- राहुल विधाते, शेतकरी.