शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
4
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
5
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
6
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
7
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
8
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
9
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
10
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
11
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
12
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
13
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
14
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
15
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
16
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
17
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
18
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
19
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
20
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:22 IST

चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवन क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोमा बीटातील शिवरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला.

चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवन क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोमा बीटातील शिवरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. रात्री १२ वाजताच्या सुमारास मृतदेह गवसला. नीलकंठ भुरे (६०)असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून ते माजी सरपंच होते. या महिन्यातील परिसरातील दुसरी घटना आहे.

नीलकंठ भुरे यांची शेती शंकरपूर चिमूर रोड लगत शिवरा फाट्यावर आहे. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ते आपल्या शेतावर शेत पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेतातच वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. मृत शरीर ओढत नेऊन नाल्याच्या काठावर ठेवले होते. तिथेच त्यांचे दोन्ही पाय खालेल्या अवस्थेत होते. सायंकाळी आठ वाजता पर्यंत घरी का बरं आले नाहीत म्हणून घरच्यांनी शेतावर शोध मोहीम राबविली. त्यांना शोध लागला नाही. मात्र त्या ठिकाणी त्यांची  सायकल असल्यामुळे त्यांना शंका आली. त्यामुळे पुन्हा गावात जाऊन जवळपास ३० ते ४० लोक घेऊन पुन्हा शेतात जाऊन शोधमोहीम राबवली असता त्यांचा मृतदेह खाल्लेल्या अवस्थेत नाल्या काठी मिळून आला. या घटनेची माहिती चिमूर वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला. वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर वनक्षेत्रपाल यु. बी. लोखंडे वनरक्षक बुरले व इतर कर्मचारी उपस्थित होते. भिसीचे ठाणेदार भोंगाडे, पोलीस उपनिरीक्षक थूटे, पोलीस हवालदार घोडमारे आपल्या ताफ्यासह हजर होते.

घटनेची माहिती मिळतात जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजुकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक, शिवराचे सरपंच अतुल नन्नावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येणार नाही. तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ देणार नाही, अशी भूमिका  घेतली. अखेर सोमवारी पहाटे दीड वाजता चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल व मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले. तात्काळ कुटुंबाला ३० हजार रुपये रोख आणि नऊ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे मृतदेह नेण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer Killed in Tiger Attack in Chimur; Shivra Incident

Web Summary : A farmer, Nilkanth Bhure, was killed by a tiger near Shivra. He went to check his farm when the tiger attacked and dragged his body. Forest officials are investigating and providing financial assistance to the family.
टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी