शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:18 AM

पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देमृग संपला : खरीप हंगामातील धानपिकाची लागवड लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कअअचंद्रपूर : पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. परिणामी दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असतानच पावसाने पुन्हा दडी मारली आहे.मृग नक्षत्र संपला असला तरी जोरदार पावसाचा पत्ता नाही. दुसरीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. २१ जूनला मृग नक्षेत्र संपला असून २२ जूनपासून आद्रा नक्षेत्रास प्रारंभ झाला आहे. सधारणत: धानपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाच्या आद्रा नक्षेत्रात पूर्ण होत असतात. आद्रा नक्षेत्राच्या उत्तरार्ध दुसºया आठवड्यात आषाढी एकादशीच्या दरम्यान प्रत्यक्ष धानपिकाच्या रोवणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. मात्र यावर्षी वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने खरीप हंगामातील बाह्य मशागतीची सुद्धा अनेक कामे अद्यापही पूर्ण झाली नाही. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतजमीन नागरणीचे कामही रखडले आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या काही शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धानपिकांची पेरणी केली आहे. काही ठिकाणचे पºहेही उगवले आहे.आता सुरु झालेल्या आद्रात नक्षत्रात पावसाने जोर मारल्यास जिल्ह्याच्या कही भागात धान रोवणीच्या कामास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परिणामी नदी, नाले, तलावातील पाण्याने मार्च महिन्यापासून तळ गाठला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकºयांच्या निसर्गाकडे नजरा लागल्या आहेत.लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपडमागील वर्षी पीक हातात येण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांचे धान पीक करपले. तसेच पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांनी धानाची कापणीच केली नाही. तसेच उत्पादनातही मोठी घट आली होती. आर्थिक तसेच मानसिक संकट असतानाही शेतकरी पु्न्हा नव्या उमेदीने चालु वर्षातील हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने त्याची चिंता अधिकच वाढली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकाचीही हिच अवस्था असून अनेकांनी धूळपेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी उगवणी झालीच नसल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती