शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

चिमुकल्याच्या मृतदेहासह कुटुंबीय ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 6:00 AM

मागून येणारा श्री ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ०७८८ ने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये वेदांत गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान आज वेदांतची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देट्रक चालकाला सोडल्याने संतप्त : पोलिसांनी बळजबरीने मृतदेह हलविला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वडिलासोबत दुचाकीवर जात असलेला वेदांत अमृत नाईक (९) हा ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाला. २५ ऑक्टोबर रोजी येथील जनता कालेज चौकात हा अपघात घडला. जखमी वेदांतचा शुक्रवारी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी धडक देणाऱ्या ट्रकवर कोणतीही कारवाई केली नाही, यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या कुटुंबीयांनी वेदांतच्या मृतदेहासह येथील रामनगर पोलीस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन केले. दरम्यान त्यांचे पोलिसांनी काहीही न ऐकता बळाचा वापर करून मृतदेह हलविल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.चंद्रपूर येथील मेजर गेट वैद्यनगर परिसरात राहणारे अमृत नाईक हे २५ ऑक्टोबर रोजी मुलगा वेदांतला (इयत्ता तिसरी) घेऊन अ‍ॅक्टीवा क्रमांक एमएच ३४ बीके १८६८ ने जनता कॉलेज चौकातून वरोरा नाकाकडे जात होते. दरम्यान मागून येणारा श्री ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ०७८८ ने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये वेदांत गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान आज वेदांतची प्राणज्योत मालवली. अपघाताच्यावेळी ज्या ट्रकने धडक दिली. त्या ट्रकचालक तसेच मालकाला पोलिसांनी सोडून दिल्याची बाब वेदांतच्या नातेवाईकांना कळली. या प्रकरणी पोलिसांसह ट्रक मालकाने साधी विचारपूसही न केल्याने कुटुंबीय संतप्त झाले. पोलिसांनी धडक देणाºया ट्रकवर कारवाई करून वेदांतला न्याय द्यावा. अशी मागणी करीत मृतदेह थेट रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवला. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रामनगर पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, पोलिसांनी दंगानियंत्रक पथकाला पाचारण केले होते. कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत ठाण्यात ठेवलेला मृतदेह परस्पर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. यावेळी कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. मृतदेह उचलल्यानंतर चंद्रपूर-मूल मार्गावर मृतदेह असलेले वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांपुढे त्यांचे काही एक चालले नाही. दरम्यान, शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांनी रामनगर पोलीूस ठाण्यात येऊन पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त करून ट्रक चालकावर कारवाईची मागणी केली.उपचारासाठी नागरिकांनी केले पैसा गोळावेदांत हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता. त्याच्यावर उपचारासाठी पैसा नसल्याने मेजर गेट वैद्य नगर परिसरातील नागरिकांनी पैसा गोळा करून त्याच्या आईवडिलांना मदत केली. विशेष म्हणजे, मुलाच्या अपघातामुळे येथील नागरिकांनी दिवाळीसुद्धा साजरी केली नाही. हे विशेष.रामनगर पोलिसांवर रोष२५ ऑक्टोबर रोजी अपघात झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या वेदांतकडे पोलीस अथवा ट्रक मालकाने लक्ष दिले नाही. उलट पोलिसांनी ट्रक तसेच चालकाला सोडून दिले. त्यामुळे कुटुंबीयांनी रामनगर पोलिसांवर विविध आरोप करीत आपला रोष व्यक्त केला.

टॅग्स :Accidentअपघात