शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंग न केल्यास होणार २० हजारांचा दंड; महापालिकेने सुरू केली जनजागृती

By साईनाथ कुचनकार | Updated: June 20, 2023 15:56 IST

प्रत्येक घरासाठी अनिवार्य

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहीम राबविली जात आहे. परिसरातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी प्रत्येकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणे महापालिकेने अनिवार्य केले आहे. दरम्यान, ही यंत्रणा उभारली नाही, तर २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात जनजागृती केली जात आहे.

पावसाची अनिश्चितता, वाढते तापमान व विहीर-बोअरवेलद्वारे केल्या जात असलेल्या पाण्याच्या उपशाने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. आज पाण्याची बचत न केल्यास पुढील काळ कठीण असणार आहे. मुबलक पाणी हवे असल्यास पावसाचे पाणी वाचविणे हा एकमेव उपाय आहे. याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यकच आहे. याकरिता शासनातर्फे जलशक्ती अभियान व मनपातर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबविले जात आहे.नवीन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे सक्तीचे करण्यात आले आहे. शहरातील सर्व बोअरवेलधारक, विहिरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना (अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे मनपातर्फे अनिवार्य करण्यात आले आहे.

२० हजारांचा दंड

ज्या बोअरवेलधारक, विहिरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना (अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार अनुदान व मालमत्ता करात पुढील तीन वर्षांपर्यंत २ टक्के सूट सुद्धा देण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणीchandrapur-acचंद्रपूर