शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नेत्रहितांच्या संगितीकीने बल्लारपूरकरांना प्रफुल्लित केले

By admin | Updated: April 18, 2017 00:52 IST

देवाने त्यांना दृष्टी नाही दिली. पण, अंधारात जगावे कसे, याकरिता मार्ग काढण्याकरिता त्यांना बुद्धी, मन आणि गायन कला दिली.

कलावंतांनी व्यक्त केली संवेदना : मन आणि बुद्धी शाबूत, हे नियतीचे उपकार !बल्लारपूर : देवाने त्यांना दृष्टी नाही दिली. पण, अंधारात जगावे कसे, याकरिता मार्ग काढण्याकरिता त्यांना बुद्धी, मन आणि गायन कला दिली. हीच कला त्यांच्या जगण्याचे, त्यांच्या सामर्थ्याचे साधन बनले आहे. पुढे बसून असलेल्या श्रोत्यांना ते बघू शकत नाहीत. पण, आपल्या गायन व संगीताने ते प्रफुल्ल होतात याची जाणीव त्यांना होते. आणि म्हणून आपले ्नगायन अधिकाधीक कसे समृद्ध होणार याच्या प्रयत्नात ते असतात. या अशा कलागुणी नेत्रहीन गायक वादकांनी येथील श्रोत्यांची मनें जिंकली, ती कायमची! हनुमान जयंतीनिमित्त येथील किल्ला वार्डातील जोड हनुमान माता मंदिराच्या पटांगणावर नेत्रहिनाचा गायनाचा कार्यक्रम झाला. १२ ते ३० वयोगटातील हे नेत्रहीन कलावंत वाशिम जिल्ह्यातील दूरवरच्या केकतउमरा या खेडेगावाचे! त्यांच्या गायन समूहाचे नाव चेतन सेवांकुर असे आहे. भक्तीगीत, राष्ट्रीय, प्रेम आणि उडत्या चालीवरचे अशा सर्वच प्रकारची गीतं ऐकूवन त्यांनी श्रोत्यांना संगीत स्वरांनी भिजविले. या संगीत समूहाचा प्रमुख १२ वर्षीय जन्मांध चेतन पांडूरंग उचितकर हा आहे. तो गातो, वाद्य वाजवितो आणि व्याख्यानही करतो. यात त्याने नेत्रहिनांचे मनोगत मांडले. त्यांची संवेदना ऐकून श्रोत्यांची मनं गलबलून आलीत. महिलांच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्यात. तो म्हणाला, जग सुंदर आहे, असे सारेच जण सांगतात. पण, ते आम्हाला बघता येत नाही. आई- बाबा आम्हाला सतत आधार देतात. आमची काळजी घेतात. पण ते कसे आहेत, काळे की गोरे आम्हाला बघता येत नाही. देवाचे एका गोष्टीकरिता मात्र आभार मानावे लागेल. त्याने आमची दृष्टी हिरावली. पण, सुदृढ मन आणि बुद्धी दिली आहे. तेच आमचे बळ आहे. या संगीत समूहात प्रविण कठाडे, कैलाश पानबुडे, संदीप भगत, विकास गाडेकर, गौरव मालक, दशरथ जोगंदड, रुपाली फुलसावंगे, कोमल खांडेकर, लक्ष्मी वाघ, तुळशिदास तिवारी, तद्वतच या साऱ्याबाबत पालकाची भूमिका बजावत असलेले पांडुरंग उचीतकर हे आहेत. या साऱ्यांचा परिचय व कृर्तत्व प्रा. मनिष कायरकर यांनी यावेळी करवून दिला. जोड हनुमान मंदिराचे पदाधिकारी वामन मांढरे, सुधाकर घुबडे, राजू मांढरे, प्रदीप लोखंडे, राजू खनके, निलेश सज्जनवार, सुधीर कायरकर यांनी तद्वतच नगराध्यक्ष हरिष शार्म यांनी या संगीत समूहातील सदस्यांचा सत्कार केला. शर्मा यांनी याप्रसंगी आपले मनोगतही व्यक्त केले. संचालन प्रा. मनिष कायरकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)गायन कार्यक्रमातून मिळालेल्या मानधनातून काही धन समाज कार्याकरिता हे नेत्रीहन खचर करतात, याची माहिती श्रोत्यांना त्यांचा परिचय देताना झाली. आणि त्यांच्या या कार्यालाय आर्थिक मदतीचे हात श्रोत्यांमधून पुढे आले. आणि बघता बघता २० हजार रुपये गोळा झालेत. चांगल्या कामाकिरता दातृत्व मागे राहात नाही हेच त्यातून दिसून आले.