शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

राज्यात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:34 AM

विकासाच्या बाता करणारे हे सरकार केवळ सिमेंटचे जंगल निर्माण करीत आहे. आरोग्य, वीज, सिंचनाची समस्या अजुनही कायम आहे. रोजगार नसल्याने बेरोजगाराची फौज दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ,.....

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : मूलमध्ये पार पडला शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : विकासाच्या बाता करणारे हे सरकार केवळ सिमेंटचे जंगल निर्माण करीत आहे. आरोग्य, वीज, सिंचनाची समस्या अजुनही कायम आहे. रोजगार नसल्याने बेरोजगाराची फौज दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले. मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतीबा फुले मार्केट यार्डचे लोकार्पण तथा शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत होते. याप्रसंगी सत्कारमूर्ती नवनिर्वाचित खासदार बाळु धानोरकर उपस्थित होते. मेळाव्याला चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदु नागरकर, महेश मेंढे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, समता परिषदेचे सरचिटणीस दीपक वाढई, शेतकरी खरेदी- विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कवडू कुंदावार, बल्लारपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष करीमभाई, किसान सेलचे अध्यक्ष रूमदेव गोहणे, जि.प.माजी सदस्या मंगला आत्राम, नगरसेवक विनोद कामडे, ललीता फुलझेले आदींची उपस्थिती होती.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार, नवनियुक्त खासदार बाळु धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी खासदार धानोरकर म्हणाले, या विधानसभा क्षेत्रातील नागिरकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. यामुळेच मला ३२ हजार मतांची लिड मिळाली. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तळा जाऊ देणार नाही. प्रत्येक गावांत जाऊन गावातील समस्या सोडवून विकासाची गंगा पोहचविण्याचे काम आपण करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी तालुक्यातील प्रगतशीर शेतकरी घनश्याम लाडे राजगड, महेश कटकमवार बोरचांदली, ज्ञानेश्वर बोरकर उश्राळा, शामराव वाढई येजगांव, भास्कर आंबटकर नांदगांव, प्रभाकर लेनगुरे चिमढा, शालिक मुनघाटे चिखली, गणेश वाढई बेंबाळ यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संचालन संजय पडोळे यांनी तर आभार संजय पाटील मारकवार यांनी मानले. मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज