शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१८ मे रोजी ताडोबात घेता येणार निसर्ग अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:41 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या बफर क्षेत्रामध्ये १८ मे रोजी निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जुडलेल्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी होता येणार आहे.

ठळक मुद्दे६ वनपरिक्षेत्रात राहणार ५० मचाण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या बफर क्षेत्रामध्ये १८ मे रोजी निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जुडलेल्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी होता येणार आहे.सदर निसर्ग अनुभव १८ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सुरु होणार असून दुसºया दिवशी म्हणजेच, रविवारी सकाळी ८ वाजता समाप्त होणार आहे. यासाठी एकूण ६ वनपरिक्षेत्रात ५० मचाण निवडण्यात येणार आहे.सहभागी होणाऱ्यांना १५ मेपर्यंत क्षेत्र संचालक कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार असून अर्जाची छाननी केल्यानंतर व्यक्ती, मचाणाच्या ठिकाणांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना सहभाग घेता येणार आहे. निवड झालेल्या व्यक्तींना दिलेल्या गेट ला १८ मे च्या सायंकाळी ४ वाजता ओळखपत्र सोबत घेऊन यावे लागणार आहे. एका मचाणावर दोन व्यक्ती बसण्याची तरतुद राहणार असून सोबत एक गाईड राहणार आहे. अर्जदारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सोबतच जेवण, पाणी, चटई, चादर आदी वस्तुंची व्यवस्था स्वत: करावी लागणार आहे. वैद्यकीयदृष्ट्या योग्य व्यक्तींनाच सहभाग घेता येणार आहे. विशेष म्हणजे, टॉर्च, कॅमेरा, सर्चलाईट आदी वस्तू नेता येणार नसून जेवणासाठी डब्बे आणताना प्लास्टीक, थमॉकोल, अ‍ॅल्युमिनीयम फाईलचा वापर करावा लागणार असल्याची माहिती उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी दिली.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प