शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा न भरताच विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रक्कम खर्च ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

युवा शक्ती सुधारल्यास देशाचा विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा शक्तीच्या बाबतीत विशेष दृष्टिकोन आहे.  त्यामुळे २०१९-२० या वर्षासाठी शाळांमध्ये युवा व इको क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील ५७८ उच्च प्राथमिक शाळांना प्रत्येकी १० हजार रुपये तसेच १ हजार ४३ शाळांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये १९ मार्च २०२० रोजी मंजूर करून संबंधित शाळांच्या पंचायत समितीच्या खात्यामध्ये आरटीजीएस पद्धतीने वर्ग करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांची खर्चासाठी तत्परता : युवा व इको क्लबची रक्कम होणार वसूल

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्यामधील नेतृत्वगुण, प्रतिभा आणि सर्जनशीलता यामध्ये वाढ, आत्मविश्वास, छंद आणि विविध कौशल्य विकसित करण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत युवा व इको क्लब शाळांमध्ये स्थापन करून देण्यात आलेला निधी खर्च करावयाचा होता. मागील वर्षभर कोरोना संकटामुळे शाळा भरलीच  नाही. असे असतानाही काही मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या विकासाचा निधी खर्च करीत तत्परता दाखविली आहे. त्यामुळे आता हा निधी शिक्षकांकडून वसूल करण्यात येणार आहे.युवा शक्ती सुधारल्यास देशाचा विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा शक्तीच्या बाबतीत विशेष दृष्टिकोन आहे.  त्यामुळे २०१९-२० या वर्षासाठी शाळांमध्ये युवा व इको क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील ५७८ उच्च प्राथमिक शाळांना प्रत्येकी १० हजार रुपये तसेच १ हजार ४३ शाळांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये १९ मार्च २०२० रोजी मंजूर करून संबंधित शाळांच्या पंचायत समितीच्या खात्यामध्ये आरटीजीएस पद्धतीने वर्ग करण्यात आले आहे. शासनाचा उद्देश चांगला होता. मात्र, कोरोनामुळे मागील वर्षभर प्राथमिकचे वर्गच भरले नाहीत. त्यातच माध्यमिकचेही काही दिवसच वर्ग भरले. त्यामुळे ज्या उद्देशासाठी शाळांना निधी देण्यात आला, तो उद्देश साध्य झाला नाही. असे असतानाही काही शाळांतील शिक्षकांनी निधी खर्च केल्याचे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना पत्र पाठवून खर्च झालेला निधी तत्काळ वसूल करण्यासंदर्भात कळविले आहे. त्यामुळे सध्या काही मुख्याध्यापकांना चांगलाच घाम सुटला असून ही रक्कम कशी वसूल करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेआहे.

असा मिळाला होता निधीसन २०१९-२० मध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत युवा व इको क्लबसाठी जिल्ह्यातील ५७८ उच्च प्राथमिक शाळांसाठी प्रत्येकी १० हजार रुपयाप्रमाणे ५७ लाख ८० हजार, तर १०४३ प्राथमिक शाळांसाठी ५  हजार रुपयांप्रमणे ५२ लाख १५ हजार असे एकूण १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये देण्यात आले होते.

अशी करायची होती क्लबची निवड

समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या क्लबचा उद्देश ठरवून देण्यात आला. याअंतर्गत वादविवाद क्लब, कला आणि सांस्कृतिक क्लब, पुस्तक वाचन क्लब, क्रीडा क्लब स्थापन करावयाचा होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य विकसित करणे हा उद्देश होता. यामध्ये प्रत्येक क्लबमध्ये कमीत कमी ११ आणि जास्तीत जास्त कितीही सदस्य घेता येणार होते.

मागील वर्षी शाळाच भरली नाही. त्यामुळे निधी खर्च करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, ज्या शाळांना वितरित केलेला निधी खर्च केला असेल, अशा शाळांची माहिती मागितली आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.- दीपेंद्र लोखंडेशिक्षणाधिकारी प्राथमिक, चंद्रपूर

युवा व इको क्लब अनुदान खर्च करण्यात येऊ नये अशा स्पष्ट लेखी सूचना शाळांना देण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे काही शाळांनी अनुदान खर्च केले. अशा परिस्थितीत खर्च केलेले अनुदान वसूल करणे तर्कसंगत नाही. त्याचप्रमाणे खात्यातील शिल्लक व्याजसुद्धा परत करावे लागते. शाळेला प्राप्त विविध अनुदानावरील व्याज शाळेच्या खात्यावर जमा होत असते. तो खर्च करण्याचा अधिकार शाळेला असणे आवश्यक आहे. - प्रकाश चुनारकरराज्य सहकार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद  (प्राथमिक) 

 

टॅग्स :Schoolशाळा