शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

म्युकरमायकोसिसवरील खर्च ६ लाख शासनाची मदत केवळ दीड लाखांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. पण, उपचारादरम्यान स्टेराईडचा अति वापर झालेल्या व काही अनियंत्रित मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा ...

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. पण, उपचारादरम्यान स्टेराईडचा अति वापर झालेल्या व काही अनियंत्रित मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. चंद्रपुरात बुधवारी अशा ५२ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली. हे रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिसवरील लिपोसोमल एम्पोटीरीसिन-बी सहा इंजेक्शन द्यावे लागतात. एका इंजेक्शनची किमत सात हजार रुपये आहे. आता हे इंजेक्शन आरोग्य विभागच खरेदी करीत आहेत. पण, खासगी डॉक्टरांचा उपचाराचा खर्च जास्त असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.

रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची चिंता

गुरुवारपासून आरोग्य विभागानेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, पॉसॅकोनाझोल गोळ्यांचाही तुटवडा कायम आहे. शासनाकडून किती मदत मिळेल, याबाबत काही माहिती नाही.

-महेंद्र शिंगणे, तुकूम, चंद्रपूर

म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी सुमारे चार ते पाच लाखांचा खर्च येतो, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला. सरकार विमा योजनेतून दीड लाखांचा खर्च देणार आहे. मात्र, उर्वरित रकमेची सोय नाही. त्यामुळे कुठून जमवाजमव करायची हा प्रश्न आहे.

-सुधाकर राऊत, समाधी वाॅर्ड, चंद्रपूर

मोफत औषधीबाबत संभ्रम

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. काही रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. या रुग्णांना औषधी मिळत आहे. मात्र, शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणारे व महात्मा फुले विमा योजनेतील पात्र रूग्णांना मोफत औषध देण्याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. त्यामुळे काही रुग्णांचे नातेवाईक बऱ्याच औषधांचा खर्च स्वत:च करीत आहेत.

रुग्णांचा जीव धोक्यात

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना एम्पोटीसिरीन-बी हे इंजेक्शन दिले जाते. पॉसॅकोनाझोल गोळ्याही द्यावे लागतात. काही खासगी डॉक्टरर्स काही अनुषांगिक औषधांचा वापर करीत आहेत. अशा रूग्णांना मूळ इंजेक्शन मिळाले नाही तर डोळा व अन्य अवय निकामी होण्याचा धोका आहे.

खासगी रुग्णालयात अतिरिक्त आकारणी

म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे काही डॉक्टर अतिरिक्त शुल्क आकारणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खर्च वाढतो. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच या आजारावरील इंजेक्शन वितरण करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांनी सोमवारी दिल्या. इंजेक्शनप्रमाणेच उपचाराचे शुल्कही निश्चित करून देण्याची मागणी रुग्णाच्या एका नातेवाईकाने केली आहे.

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रूग्ण

५२

म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू

०१