महाऔष्णिकच्या संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 04:51 AM2018-03-02T04:51:31+5:302018-03-02T04:51:31+5:30

महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यानंतर अंदाजित व अतिरिक्त भाग भांडवलासाठी ऊर्जा विभागाने मान्यता दिल्याने संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला आहे.

The expansion of the condominium extinction was limited | महाऔष्णिकच्या संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला

महाऔष्णिकच्या संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला

googlenewsNext

राजेश मडावी 
चंद्रपूर : महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यानंतर अंदाजित व अतिरिक्त भाग भांडवलासाठी ऊर्जा विभागाने मान्यता दिल्याने संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला आहे.
राज्याच्या एकूण वीज उत्पादनात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा वाटा सर्वाधिक आहे. उद्योग, वाणिज्यिक व घरगुती वीज वापरण्याचे दरडोई प्रमाण वाढल्याने राज्यात अतिरिक्ति वीज उत्पादनाची दिवसेंदिवस गरज भासत आहे. त्यामुळे या केंद्रातील प्रती ५०० मे. वॅ. क्षमतेच्या आठ आणि नऊ या दोन संचाच्या विस्तारीकरणासाठी उद्योग व ऊर्जा विभागाने राज्य वितरण निर्मिती कंपनीला मंजुरी दिली होती. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान पुरवठ्यातील फरक, बाजार मूल्यांकनात होणारा बदल, कामासाठी लागणाºया साधसामुग्रीची किंमत व निर्देशांकात झालेली वाढ आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा विलंब आदी कारणांमुळे खर्चात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सुधारित खर्च व वाढीव भागभांडवलासाठी मंजुरी देण्याचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित होता.
दरम्यान, १५ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. मात्र, मंजुरीसंदर्भात विचार झाला नव्हता. परिणामी, मूळ प्रकल्प खर्च, महानिर्मितीच्या प्रस्तावाप्रमाणे सुधारित प्रकल्प खर्च, वाढीव खर्च आणि प्रत्यक्षात व्यापारी तत्त्वावर सुरू होईपर्यंतच्या कालावधीसाठी होणाºया अतिरिक्त सुधारित खर्चाबाबत कामालीचा संभ्रम निर्माण झाला होता.
> वीज उत्पादनात अव्वल
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील आठ व नऊ क्रमांकाच्या संच विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यास राज्यातील विजेची समस्या कायमची दूर होणार आहे. वेकोलिने कोळसा उत्पादन व आयात धोरणात बदल केल्याने राज्यातील काही औष्णिक केंद्राच्या वीज उत्पादनाला मोठा फ टका बसला आहे. तर खासगी वीज उत्पादक कंपन्यांकडून वीज खरेदी करताना दर निश्चितीचा प्रश्न सुटला नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे वीज उत्पादन अव्वल ठरले आहे. दोन संचाच्या विस्तारीकरणानंतर वीज उत्पादनात पुन्हा भर पडू शकते.

Web Title: The expansion of the condominium extinction was limited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.