शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

बल्लारपुरात सायकल दिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 24, 2015 01:22 IST

आरोग्याला लाभदायी आणि वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, याकरिता इंधनाची वाहने न चालविता आठवड्यातून निदान एक दिवस सायकल चालवून पर्यावरण राखण्याला मदत व्हावी,

उपक्रमाचे कौतुक : अनेकांना आठवले बालपणबल्लारपूर : आरोग्याला लाभदायी आणि वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, याकरिता इंधनाची वाहने न चालविता आठवड्यातून निदान एक दिवस सायकल चालवून पर्यावरण राखण्याला मदत व्हावी, या हेतूने जिल्हा पोलीस विभागाने सुरू केलेल्या सायकल दिवसाला येथे पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. या अभियानात सुमारे अडीच-तीनशे लोकांनी सहभाग घेऊन, शहरवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचा संदेश दिला.बल्लारपुरात आठवड्याच्या दर रविवारला हा उपक्रम राबविला जाणार आहे. याचा प्रारंभ करण्यात आला आहे. येथील पेपर मिल कलामंदिरपासून सुरू होऊन शहराच्या मुख्य मार्गाने होत ही सायकल यात्रा पोलीस ठाण्याच्या आवारात पोहचून तेथे समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक संदीप दिवाण होते. नगरपालिचे मुख्याधिकारी विपीन मुदधा, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खान, वसंत खेडेकर, डॉ. नितीन कल्लूरवार, राजू दारी यांची मंचावर उपस्थिती होती. प्रदूषणाच्या चिंतेवर केवळ चर्चा न करता ते कसे दूर होईल, यावर कृती करणे गरजेचे आहे. पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना एक दिवस विश्रांती देऊन त्या ऐवजी सायकल चालविणे, हा यावर सोपा व स्वस्त उपाय आहे, असे सांगत पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी सर्वांनी तसे करावे आणि विशेषत: पालकांनी व शिक्षकांनी आपले पाल्य व विद्यार्थी यांना त्याकरिता प्रवृत्त करावे, असे आवाहन केले.तसेच, बल्लारपुरात या अभियानाच्या सुरूवातीलाच जो प्रतिसाद मिळाला, त्याची प्रशंसा करीत हे सातत्य कायम राहावे, यात आणखी भर पडावी याकरिता साऱ्यांनी प्रयत्न करावे असे म्हणाले. विपीन मुदधा, प्राचार्य खान आणि वसंत खेडेकर यांचीही भाषणे झालीत. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, संचालन अजय दुबे व आभार प्रदर्शन सहायक उपनिरीक्षक लता वाढिवे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)