शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

प्रत्येक शेतकऱ्याच्या फोनमध्ये 'ही' ॲप असायलाच पाहिजे ! हवामान अंदाज आणि पीक नुकसान टाळण्यासाठी करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:11 IST

Chandrapur : नियमित पाऊस, वादळ, तापमानासह मिळणार हवामानाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: हवामानाचा अंदाज घेऊन शेतीकामाचे नियोजन केल्यास अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यापासून पिकांची होणारी नासाडी काही प्रमाणात रोखली जाऊ शकते. सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना हवामानाची बिनचूक माहिती मिळावी, यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र 'मेघदूत' ॲप विकसित केले आहे.

या ॲपद्वारे शेतकऱ्यांना नियमित पाऊस, वादळ, तापमान यासह हवामानाची माहिती व योग्य सल्लाही मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे अॅप डाउनलोड केले पाहिजे.

मेघदूत ॲपचा वापर करावाभारतीय हवामानशास्त्र विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय उष्ण प्रदेशीय हवामान विज्ञान संस्था पुणे यांच्यातर्फे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मेघदूत अॅप विकसित करण्यात आले आहे. मेघदूत अॅपचा वापर केल्यास शेतकऱ्यांना पिकांचे योग्य नियोजन करीत हवामानामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी मेघदूत अॅपचा वापर करणे अपेक्षित आहे.

'स्कायमेट वेदर'वर जा, उपग्रह प्रतिमा पाहादेशात यंदा दमदार पाऊस बरसणार असून, मान्सूनचा हंगाम सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेट या हवामानविषयक अंदाज वर्तविणाऱ्या खासगी संस्थेने एप्रिल महिन्यात वर्तविला होता. मे महिन्यात भरपूर पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असाही अंदाज आहे.

पेरणी असो की कापणी, मळणी; हवामानाचा अंदाज आवश्यकजिल्ह्यात मे महिन्यापासून अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीकामे प्रभावित झाली आहेत. आता लवकरच मान्सून पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पेरणी असो की कापणी, मळणी, शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेणे आवश्यक आहे. 

अचूक अंदाज अन् कृषी सल्ला क्लिकवर मिळणारआधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे निर्णय अधिक परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने 'महाविस्तार ए.आय. ॲप' उपलब्ध करून दिले आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल मार्गदर्शक ठरणार असून, त्यामध्ये पीकसल्ला, बाजारभाव, हवामान अंदाज, रोगनिदान तसेच योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आयएमडी' वेबसाइटवरही महत्त्वाची माहिती

  • स्थानिक हवामानाच्या सध्या स्थितीची माहिती आणि भारतीय हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी) अधिकृत हवामान अंदाज आता 'भौसम' या मोबाइल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. मौसम या अॅपद्वारे नागरिकांना हवामानाची अद्ययावत माहिती, हवामान अंदाज आणि तीव्र हवामानाच्या घटनांचे इशारे मिळू शकतील.
  • ॲपमधून शहरामधील तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वेग, पर्जन्यमान, सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्रोदय चंद्रास्ताच्या वेळा, जवळच्या रडारद्वारे टिपलेली ढगांची स्थिती याबाबतची अद्ययावत माहिती मिळत आहे.
  • जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिक घेतल्या जाते. यामध्ये कोरपना, राज्जुरा, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, जिवती या तालुक्यात कापूस तसेच सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. तर चिमूर, सिंदेवाही मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, गोंडपिपरी, बल्लारशा या तालुक्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतल्या जाते. सध्या शेतकरी शेतीच्या मशागचीच्या कामात व्यक्त्त असून पावसाची वाट बघत आहे.
टॅग्स :farmingशेतीchandrapur-acचंद्रपूर