शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह घरात तरीही सावकार येतो दारात, बेकायदेशीर सावकारीचा अमानवी चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:41 IST

३० ऑगस्ट २०२२ रोजी रोशन कुळे यांच्या आजीचे निधन झाले. संपूर्ण कुटुंब शोकाकुल अवस्थेत असतानाच सकाळीच सावकार प्रदीप रामभाऊ बावनकुळे यांचा पैशांसाठी निरोप आला. 

घनश्याम नवघडे -

नागभीड (चंद्रपूर) : ग्रामीण भागातील बेकायदेशीर सावकारी किती अमानुष पातळीवर पोहोचली आहे, याचे धक्कादायक वास्तव नागभीड तालुक्यातून समोर आले आहे. घरात आजीचा मृतदेह असतानाही सावकाराने व्याजाच्या पैशांसाठी फोनवरून तगादा लावल्याचा गंभीर आरोप सावकारांच्या पाशात अडकून किडनी विकणारा मिंथूर येथील पीडित शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी ‘लोकमत’कडे केला आहे.

३० ऑगस्ट २०२२ रोजी रोशन कुळे यांच्या आजीचे निधन झाले. संपूर्ण कुटुंब शोकाकुल अवस्थेत असतानाच सकाळीच सावकार प्रदीप रामभाऊ बावनकुळे यांचा पैशांसाठी निरोप आला. 

अंत्यसंस्काराची तयारी सुरू तरी सावकाराचा तगादामृत्यूची माहिती देऊनही ‘तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, मला माझे पैसे हवेत,’ असे सांगत परिणामांची आठवण करून दिल्याचा आरोप रोशन कुळे यांनी यावेळी केला.

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, झालेला हा दबाव केवळ अमानवी नाही, तर सावकारी कायद्याची थेट पायमल्ली असल्याचे स्पष्ट होते. 

मात्र, अशा प्रकरणांत प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि सावकारी प्रतिबंधक समित्यांची भूमिका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे, हाही त्याच्या आप बितीमागील सूर होता.

सावकारासठी दुभती गाय - रोशन कुळे यांनी सांगितले की, सावकार एकदा गरजू व्यक्तीला जाळ्यात ओढले की, त्याला बाहेर पडू देत नाहीत. व्याजावर व्याज, धमक्या आणि मानसिक छळ हेच त्यांचे हत्यार असते. ‘आमच्या दुःखाशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. त्यांच्यासाठी गरजू माणूस म्हणजे दुभती गाय असतो,’ असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

या सततच्या छळामुळे आपण तीव्र मानसिक दबावाखाली गेलो होतो आणि दोन वेळा टोकाचे विचार मनात आले, अशी कबुलीही रोशन कुळे यांनी दिली. ही बाब केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी आणि गरजूंना भेडसावणाऱ्या संकटाचे भयावह चित्र आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Loan shark demands money despite death in farmer's family.

Web Summary : A farmer, burdened by debt, alleges a loan shark harassed his family for money even as they mourned a death. The inhumane incident highlights the ruthless exploitation prevalent in illegal lending, pushing victims to desperation and suicide attempts.