आंदोलना नंतरही रामदेगी, संघारामगिरीला प्रवेश बंदीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:53 AM2021-02-18T04:53:17+5:302021-02-18T04:53:17+5:30

चिमूर : रामदेगी-संघारामगिरी येथे मागील अनेक दिवसांपासून बौद्ध धर्मगुरू (भंतेजी) व रामदेगी तीर्थक्षेत्र येथील साधुसंत यांना त्यांच्या मठात व ...

Even after the agitation, entry to Ramdegi and Sangharamgiri was banned | आंदोलना नंतरही रामदेगी, संघारामगिरीला प्रवेश बंदीच

आंदोलना नंतरही रामदेगी, संघारामगिरीला प्रवेश बंदीच

Next

चिमूर : रामदेगी-संघारामगिरी येथे मागील अनेक दिवसांपासून बौद्ध धर्मगुरू (भंतेजी) व रामदेगी तीर्थक्षेत्र येथील साधुसंत यांना त्यांच्या मठात व विहारात रामदेगी संघारामगिरीत वनविभाग जाऊ देण्यास मज्जाव करत होता. या विरोधात १२ फेब्रुवारीला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन केले. मात्र, आंदोलनानंतरही वनविभागाने भन्ते व भाविक यांना रामदेगी-संघरामगिरी येथे प्रवेश वनविभागाने नाकारला.

रामदेगी हे हिंदूधर्मियांचे श्रद्धास्थान आहे तर संघारामगिरी हे बौद्धांचे प्रेरणास्थान आहे. येथे देश-विदेशांतून बौद्ध अनुयायी व भाविक भक्त येऊन तथागतासमोर नतमस्तक होत असतात तर रामदेगीत भजन, कीर्तनाच्या माध्यमातून कार्यक्रम होत असतात. परंतु वाघ, बिबट्याचा वावर असल्याचे कारण सांगून देवस्थानमधील साधुसंत, बौद्ध धर्मगुरू यांचे जाणे-येणे वनविभागाने गेट लावून बंद केले.

वनविभागाचे लावलेले गेट कायमस्वरूपी सुरू व्हावे. साधुसंत, बौद्ध धर्मगुरू, बौद्ध अनुयायी व भाविक भक्तांना वनविभागांनी कसल्याही प्रकारे अडवणूक करू नये. याकरिता १२ फेब्रुवारीला रामदेगी-संघारामगिरी येथील वनविभागविरुद्ध वनविभागाच्या गेटवर क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर १५ फेब्रुवारीला रामदेगी येथील व्यावसायिक सलीम पठाण हे बौद्ध धर्मगुरू यांना सोडून देण्यासाठी गुजगव्हांन ते रामदेगी-संघारामगिरी येथे जात असताना वनविभागाने गेटजवळ अडवून संघारामगिरी येथे जाण्यास परवानगी दिली नाही. यासाठी चंद्रपूर येथून परवानगी आणण्याचा सल्ला दिला.

त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजारो नागरिकांना दिलेले आश्वासन एक फार्स होता काय, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे

कोट

रामदेगी बफर गेटवरून भन्तेजींना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्यास बंदी आहे. २६ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक आहे. बैठकीत जे निर्णय घेण्यात येतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

- किरण धानकुटे वनपरिक्षेत्र अधिकारी, खडसंगी बफर झोन.

Web Title: Even after the agitation, entry to Ramdegi and Sangharamgiri was banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.