शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शैक्षणिक सत्राला महिना उलटल्यानंतरही चंद्रपुरातील आरटीईच्या ३९ हजार ६८२ जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:17 IST

Chandrapur : एक लाख एक हजार ९६७ जागांपैकी केवळ ६९ हजार ४२० बालकांचाच झाला प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीईअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेशासाठीच्या राखीव २५ टक्के कोट्यासाठी सन २०२५-२०२६ या शैक्षणिक सत्रासाठी राज्यभरात एक लाख एक हजार ९६७ विद्यार्थ्यांची निवड केली. मात्र, त्यापैकी केवळ ६९ हजार ४२० बालकांचाच आतापर्यंत प्रवेश झाला आहे. 

परिणामी, शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असतानाही तब्बल ३९ हजार ६८२ जागा राज्यात शिल्लक असल्याचे वास्तव आहे. आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सन २०२५-२०२६ या सत्रासाठी आठ हजार ८६३ शाळांची नोंदणी झाली. यात एक लाख ९ हजार १०२ जागा रिक्त आहेत. त्यासाठी तीन लाख ५ हजार १५१ जणांनी अर्ज केले. त्यापैकी एक लाख १ हजार ९६७ जणांची प्रवेश फेरीतून निवड झाली. मात्र, आतापर्यंत केवळ ६९ हजार ४२० जणांचाच प्रवेश झाला आहे, तर ३९ हजार ६८२ जागा रिक्त राहणार आहेत. 

विदर्भातील प्रवेश झालेली स्थितीअमरावती १०६७, अकोला १४०१, यवतमाळ १२५३, बुलढाणा २०६७, वाशिम ६८५, नागपूर ४५७६, भंडारा ६०९, गोंदिया ७५१, चंद्रपूर १०७२, गडचिरोली ३०७, वर्धा २१६

प्रवेशाकडे का फिरवत आहेत पाठ ?जिल्ह्यात वा शहरात ज्या नामांकित शाळा आहेत. त्यापैकी काही शाळा या आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवत नाही. अनेकांना आपल्या मर्जीतील शाळा मिळत नाही. त्यामुळे अनेक जण प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवत आहेत.

दरवर्षीच जागा राहतात रिक्तनामांकित शाळेतील शिक्षण महागडे झाले असल्याची पालकांची ओरड असली तरीही दरवर्षीच अनेक जणांची निवड झाली असतानाही प्रवेश घेत नाही. त्यामुळे २५ हजारांच्या आसपास जागा रिक्त राहत असल्याचे चित्र दरवर्षीच दिसून येते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरRight To Educationशिक्षण हक्क कायदा