शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

२४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 5:00 AM

वाघाचा बछडा ठणठणीत झाला आहे. त्यांच्या आईकडे सोडण्यासाठी वनविभागाने वाघिणीचा शोध घेतला असता केळझर सुशी परिसरात दोन वाघीण प्रत्येकी तीन बछडयासह आढळल्याने खरी आई कोण, असा प्रश्न वनविभागाला पडला आहे. तब्बल २४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका असल्याचे दिसूून येत आहे. मात्र वनविभागाला बछडयाची आई शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ठळक मुद्देदोन वाघीण सापडल्याने संभ्रम : उपचारानंतर बछड्याची प्रकृती ठणठणीत

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर क्षेत्रातील सुशी या गावात २४ एप्रिलला सकाळी अजय शेंडे यांच्या घराजवळील तणसाच्या ढिगाजवळ अंदाजे तीन साडेतीन महिन्यांचा वााघाचा बछडा मिळाला होता. सदर बछड्यावर चंंद्रपूरच्या प्राणी उपचार केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले. सदर वाघाचा बछडा ठणठणीत झाला आहे. त्यांच्या आईकडे सोडण्यासाठी वनविभागाने वाघिणीचा शोध घेतला असता केळझर सुशी परिसरात दोन वाघीण प्रत्येकी तीन बछडयासह आढळल्याने खरी आई कोण, असा प्रश्न वनविभागाला पडला आहे. तब्बल २४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका असल्याचे दिसूून येत आहे. मात्र वनविभागाला बछडयाची आई शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.मूल तालुक्यातील सुशी या गावातील अजय शेंडे यांच्या घराजवळील तणसाच्या ढिगाऱ्यात २४ एप्रिल रोजी एक वाघाचे बछडे दिसून आले. याबाबतची माहिती होताच मूल येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे यांनी विभागीय वनाधिकारी सोनकुसरे व मूल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गदादे यांना घटनेची माहिती देऊन वनरक्षक मरस्कोले यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहाणी करुन विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांच्या परवानगीने वाघाच्या बछडयाला सुखरुप पकडून केळझर येथील नर्सरीत आणण्यात आले. यावेळी वनाधिकारी सोनकुसरे व अती शीघ्र कृती दलाचे बडकेलवार, बेग यांनी वाघाच्या बछड्याला प्राणी उपचार केंद्र चंद्रपूरला नेले. त्यावर योग्य ते उपचार करण्यात आल्यावर वाघाचा बछडा पुर्णपणे निरोगी असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर बछड्याला त्याच्या आईला शोधून तिच्याजवळ सोडण्याविषयी वनविभागाने प्रयत्न चालविला. विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी राजूरकर व त्यांच्या सहकाºयाच्या मदतीने वाघिणीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी एक नव्हे तर दोन वाघीण असल्याचे दिसून आले.सदर दोन्ही वाघिणीला तीन तीन बछडे असल्याचे दिसून आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी चक्रावून गेले. बछडयाची खरी आई कोणती, याबाबत चर्चा सुरू झाली. चर्चेनंतर एक विशिष्ट चाचणीद्वारे ओळख परेड केली जाणार आहे. यासाठी वनविभागाने प्रयत्न चालविला आहे. काही दिवसात खºया आईचा शोध लावल्यानंतर वाघाच्या बछडयाला मातेची ममता लाभणार आहे.

टॅग्स :Tigerवाघ