शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श प्रस्थापित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:54 IST

चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यात वेकोलिच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात २९ ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ५० जलशुद्धीकरण संयंत्रे देखभाल व दुरूस्तीसाठी महिला बचतगटांना हस्तांतरीत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यात वेकोलिच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात २९ ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्यात येतील. यासाठी सरकारचा कोणताही निधी न वापरता हा प्रयोग राबविणार आहोत. पाण्याचा योग्य वापर, त्याचे योग्य व्यवस्थापन हे कौशल्य मातृशक्तीला योग्य पध्दतीने अवगत असल्याने महिला बचतगटांना व्यवस्थापनाचा भार सोपविण्यात आला आहे. महिला बचतगटांनी ही जबाबदारी प्रभावीपणे राबवून राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श प्रस्थापित करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात रविवारी आयोजित हस्तांतरण प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये भेल व महानिर्मीती कंपनीच्या सीएसआर निधीतून जलशुध्दीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) बसविण्यात आले आहेत. ही संयंत्रे देखभाल, दुरूस्ती व संचलन यासाठी महिला बचतगटांना हस्तांतरीत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, रोशनी खान, वनीता आसुटकर, पंचायत समिती सदस्य केमा रायपूरे, रामपालसिंग, प्रमोद कडू आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात ५० महिला बचतगटांपैकी काही महिला बचतगटांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्यवरांच्या हस्ते हस्तांतरण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच जिल्ह्यातून दहावीमध्ये प्रथम आलेली साक्षी मारोती वराटकर, द्वितीय आलेली गौरी प्रविण भोयर, तृतीय अंजली राजेश विचुरकर, चौथी गुंजन यादवराव खराबे, पाचवी सेजल सुनील आयलनवार तर सहावी किशोरी दशरथ राजुरकर या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी तर प्रास्ताविक मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले.गावकऱ्यांना शुद्ध व थंड पाणी मिळणारमहिला बचत गटांना जलशुद्धीकरण संयंत्रांच्या देखभाल व दुरूस्तीच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. या जलशुद्धीकरण संयंत्रांच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाण्यासह थंड पाणी देण्यात येणार आहे. यादृष्टीने संयंत्राला चिलर बसविण्यात आल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.