शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रपूर पोलिस' साइटवरच चुका : फोटो एकाचा नाव दुसऱ्याचे ; अधिकाऱ्यांच्या पदातही चुकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:37 IST

Chandrapur : आयपीएस अधिकाऱ्याचे पोर्टलवर केले डिमोशन

परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : 'सदैव तत्पर, आपल्यासोबत आपल्यासाठी' असे ब्रिद असलेल्या 'चंद्रपूरपोलिस' या साइटवर मोठ्या प्रमाणात चुकाच चुका दिसून येत आहेत. फोटो एका अधिकाऱ्यांचा, तर नाव दुसऱ्या अधिकाऱ्यांचे, एका मोठ्या अधिकाऱ्यांच्या पदात तर मोठी चूक करून त्यांचे डिमोशनच केले आहे. एवढेच नाही तर अनेक ठिकाणचे अधिकारी बदलले असून, जुनीच नावे व फोटो आहेत. त्यामुळे कोणत्या ठिकाणचा अधिकारी कोण आहे, कुणाला संपर्क करायचा, असा प्रश्न जनसामान्यांना पडत आहे.

आपत्कालिन स्थितीत सर्वसामान्यांना संबंधित ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करता यावा, यासाठी जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने 'चंद्रपूर पोलिस' ही साइट तयार करण्यात आली आहे. या साइटवर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, पोलिस विभागातील सर्व शाखा, सर्व ठाण्यातील ठाणेदार, सहायक पोलिस निरीक्षक यांची नावे व मोबाइल नंबरची नोंद असते. आपत्कालीन स्थितीत त्या साइटवर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क करणे सोपे होते. मात्र, सद्यस्थितीत या साइटवर चुकाच चुका दिसून येत आहेत. 

अशा आहेत चुकामूलचे एसडीपीओ म्हणून सुधाकर यादव हे प्रभार सांभाळत आहेत. तरीही या साइटवर परिविक्षाधीन अधिकारी तथा तत्कालिन मूलचे एसडीपीओ प्रमोद चौगुले यांचे नाव आहे. मात्र, फोटो गडचांदूर येथील एसडीपीओ वींद्र जाधव यांचा आहे.

आयपीएस अधिकाऱ्याचे पोर्टलवर केले डिमोशनवरोरा येथील एसडीपीओ (आयपीएस) नयोमी साटम यांच्या नावापुढे एपीआय लिहून त्यांचे तर डिमोशनच केले आहे. यासह इतरही अनेक चुका आहेत. त्यामुळे ही साइट उघडताच नेमका अधिकारी कुठला, संपर्क करायचा तर कुणाला, असा प्रश्न निर्माण होत आहे.

साइट अपडेट, मजकूर जुनाचपूर्वीच्या तुलनेत चंद्रपूर पोलिस ही साइट मागील काही महिन्यांपूर्वी नव्या रुपात अपडेट करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, पोलिसांचे उपक्रम, प्रेस नोट यांसह विविध विभागांची माहिती टाकली आहे. मात्र, त्यातील पोलिस अधिकाऱ्यांची नावे अपडेट करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी बदलूनही त्यांचेच नाव आहे. मूल येथे सद्यस्थितीत एसडीपीओ सुधाकर यादव, तर मूलचे पीआय म्हणून एपीआय वंजारी हे प्रभार सांभाळत आहेत. तरीही पीआय म्हणून प्रमोद चौगुले यांचेच नाव आहे. राजुराचे ठाणेदार म्हणून सुमित परतेकी धुरा सांभाळत आहेत. परंतु, पोर्टलवर राजुराचे तत्कालिन ठाणेदार एएसपी अनिकेत हिरडे (आयपीएस) यांचेच नाव आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरPoliceपोलिस