शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा: सुधीर मुनगंटीवार

By राजेश भोजेकर | Updated: October 4, 2023 21:34 IST

पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला स्वागत आणि अभिनंदन सोहळा!

राजेश भोजेकर चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक करोड कोहिनूर ओवाळून टाकावे असा राजा होय. जेव्हा गोठ्यातली गाय आणि घरातली माय धोक्यात येते,  क्रुरता आपली सिमा ओलांडते तेव्हा एक तर देव अवतार घेतो किंवा शिवबा अवतार घेतात; छत्रपती  शिवाजी महाराज आमच्यासाठी देव जरी नसतील तरीही देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत, या महानायकाचा  अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमित  उभारण्यासाठी मी आणि महाराष्ट्र सरकार  पूर्ण सहकार्य करेल, तुम्ही पुढाकार घ्या मी पुतळा देईन अशी ग्वाही राज्याचे वने,  सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

विजापूरचा मुगल सरदार अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी महाराजांनी बाहेर काढला ती वाघनखे परत मिळविण्यासाठी  ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर ना. मुनगंटीवार यांचा  लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी भव्य समारंभ आयोजित करुन सत्कार केला. या सोहळ्यात ते बोलत होते. ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की,  मला जेव्हा सूचना केली की लंडन येथे  छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर पुतळा  उभा करावा, तेव्हा मला अतिशय आनंद झाला; मी लगेच संमती दिली. यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने तुमच्या पाठिशी उभे राहील.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी विचार विश्वात पोहचावा अशी  आमची अपेक्षा आहे.  हा विचार जगातील प्रत्येक देशापर्यंत, देशातील प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावांपर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक आई-बहिणी पर्यंत,  पोहचविण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने केला आहॆ. यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे असेही ते म्हणाले.

लंडनच्या मराठी बांधवांचे आभार मानताना ना. मुनगंटीवार म्हणाले, आयुष्यामध्ये अनेक आनंदाचे क्षण येतात त्यापैकी आजचा एक  आनंदाचा क्षण आहे. तुमच्या सर्वांची भेट घेताना, तुमच्याशी संवाद साधताना, तुमचं दर्शन घेताना मलाही मनापासून आनंद होतोय. जगातील १९३ देशात देशांत सर्वांत श्रेष्ठ भारत असून त्यात आमचा महाराष्ट्र महान आहे . ते म्हणाले मी भाग्यवान आहे, सांस्कृतिक मंत्री म्हणून शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी काम करण्याची संधी मिळाली. हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या अफजलखानाची कंबर उखडून टाकण्याचे सौभाग्य मला मिळाले; त्याचे उदात्तीकरण आम्ही सहन करु शकत नाही.

आग्र्याच्या किल्यात जेथे महाराजांचा अपमान झाला तेथेच भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करुन अभिवादन केले, राज्यात ठीकठिकाणी जाणता राजा महानाटय़ाचे प्रयोग असे कितीतरी उपक्रम राबविण्याची संधी मिळाली. आमचा राजा शूर होता, वीर होता, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक होता; त्यामुळे मराठी मातीशी नाळ जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात फक्त शिवबाच असावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामंजस्य करार करण्यास ना. सुधीर मुनगंटीवार लंडनला येणार हे कळल्यापासूनच स्थानिक शिवप्रेमी मराठी बांधव उत्साहित होते. मंगळवारी दुपारी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्तुझियम जवळ ना. मुनगंटीवार पोहोचताच  पारंपरिक मराठमोळ्या वेषात, ढोलताशांच्या गजरात त्यांचे  स्वागत या महाराष्ट्र मंडळाने केले. सामंजस्य करार झाल्यानंतर अतिशय देखणा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला; स्फुर्तीगीत, पोवाडा, पारंपरिक नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग अशा विविध छटांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारLondonलंडन