शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पंचसूत्रीतून जिल्हा कृषी समृद्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:28 IST

कृषी व्यवसाय हा संवेदनशील व्यवसाय आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान वापराचे ज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठे शेतकºयांच्या आर्थिक क्रांतीची केंद्र झाली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद्याची उपलब्धता व योग्य प्रशिक्षण या पंचसूत्रींचा अवलंब करून जिल्हा कृषी समृद्ध करण्यासाठी सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हा कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवाला थाटात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कृषी व्यवसाय हा संवेदनशील व्यवसाय आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान वापराचे ज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीची केंद्र झाली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद्याची उपलब्धता व योग्य प्रशिक्षण या पंचसूत्रींचा अवलंब करून जिल्हा कृषी समृद्ध करण्यासाठी सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे. शेती हाच विकासाचा महामार्ग आहे. उन्नत शेतीसाठी सर्व प्रयत्न करा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.११ ते १५ जानेवारीपर्यंत येथील चांदा क्लब ग्राउंडवर जिल्हा कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवाचे आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी समाजातील सर्वात प्रामाणिक घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स शिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनाही खास निमंत्रित करण्यात आले होते. या दोघांनीही यावेळी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत वाघमारे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपाचे उपआयुक्त भालचंद्र बेहरे आदींची उपस्थिती होती. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, शेती हा व्यवसाय फायद्याचा व्हावा, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे.कृषी विद्यापीठांमध्ये एकात्मिक कृषी व्यवसाय या प्रकल्पामध्ये अडीच एकराच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न एकरी चार लाख रुपये कसे होईल, याचे प्रात्यक्षिक आपण स्वत: बघितले. त्यामुळे नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे. शेती, जोडधंदा, प्रशिक्षण अशा माध्यमातून एकात्मिक कृषी व्यवसाय शक्य आहे. जिल्ह्यामध्ये काही प्रयोग सुरू झाले आहेत. चंद्रपूरमध्ये धान उत्पादक पाच हजार शेतकºयांना प्रशिक्षित करण्याचे काम सध्या सुरू आहे. कृषी विद्यापीठांनी प्रत्येक विभागातील दहा दहा गावे दत्तक घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी जमिनीमध्ये कशा पद्धतीने भरघोस पीक घेता येतात, याचे प्रात्यक्षिक द्यावे. यासाठी लागणारा खर्च शासन उचलेल पण कृषी विद्यापीठे हे कृषी आर्थिक क्रांतीचे केंद्र झाली पाहिजेत. विद्यापीठाचे प्रयोग प्रत्यक्षात उतरले पाहिजे.यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पशुसंवर्धन व मत्स्य विद्यापीठाने चंद्रपूर जिल्हा दत्तक घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शेती विकासासंदर्भातल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.या कार्यक्रमात दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी उपस्थित शेतकºयांंना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी तर संचालन हेमंत शेंडे व एकता बंडावार यांनी केले.कृषी विद्यापीठांनी सॉईल हेल्थ कार्डसह पिकांबाबतही मार्गदर्शन करावेजिल्ह्यामध्ये जे.के. ट्रस्टच्या मदतीने दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरीचे जाळे विणले जात आहे. स्वीट क्रांतीला मधुमक्षिका पालनातून जिल्ह्यात सुरुवात झाली. एक हजार आदिवासी महिलांच्या निर्मितीच्या कंपनीलादेखील चालना दिली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. कृषी विद्यापिठांनी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ सॉईल हेल्थ कार्ड देऊन गप्प बसू नये. शेतकºयांना त्यांच्या जमिनीमध्ये कोणते पीक घ्यावे, याबाबतचे मार्गदर्शन करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.१५ दिवसात नुकसानभरपाईवन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला द्यावा हा कायदा लवकरच सरकार करत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या कायद्यान्वये १५ दिवसांच्या आत नुकसान भरपाई मिळेल,अन्यथा वनाधिकाºयांना दंड ठोठावला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.जिल्ह्यात क्लस्टर निर्मितीला वावया कृषी प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोगाची चर्चा, चिंतन व मनन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लस्टर निर्मितीची संधी आहे. चिमूरमध्ये हळदीचे तर कोठारी व जिवती या परिसरात भाजीपाल्याचे क्लस्टर उभे राहू शकते. यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणत्या भागात कुठल्या पिकाचे क्लस्टर उभारायचे, याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी विद्यापीठाला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केल्या.