शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य लाभल्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य मला लाभले, ती सैनिकी शाळा देशातील अद्वितीय, अदभुत शाळा म्हणून लौकीकप्राप्त ठरावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशभक्तीची भावना ही क्षणिक न ठेवता वर्षभर ही भावना मनात कायम ठेवत भारताच्या विकासाचा विचार पुढे नेण्याची आज नितांत आवश्यकता आहे. लालबहादुर शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, अटलजींनी त्याला जय विज्ञान अशी जोड दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय अनुसंधान अशी जोड त्याला दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्यपरायणतासुध्दा शिकविते. ज्या सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य मला लाभले, सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य मला लाभले, ती सैनिकी शाळा देशातील अद्वितीय, अदभुत शाळा म्हणून लौकीकप्राप्त ठरावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैनिकी शाळेचे प्राचार्य स्क्वाड्रन लिडर नरेशकुमार, उपप्राचार्य लेफ्टनंट जनरल अनमोल, चंद्रपूर मनपाचे सदस्य संजय कंचर्लावार, रवी आसवानी, प्रविण पडवेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तिरंगा ध्वजाला व वीर जवानांना आदरांजली दिली. गणराज्य दिन चिरायु होवो, अशी भावना व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे व परेडचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, जेव्हा विद्यार्थी परेडदरम्यान सोबत पुढे जात होते तेव्हा ऐक्याची भावना प्रदर्शित झाली.कोणीही एकटा नव्हता. हे ऐक्य भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. जगातल्या काही देशांना भारताची प्रगती आवडत नाही, ते भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. मात्र भारताने वेळोवेळी त्यांना चौख उत्तर दिले आहे. ‘दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे गीत विद्यार्थ्याने गायले. देशाचे रक्षण करण्यासाठी तळहातावर प्राण घेवून सीमेवर सैनिक तैनात आहे. या सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी देश रक्षणासाठी ‘दिल दिया है पढाई में ध्यान भी देंगे’ अशी भावना ठेवत आदर्श निर्माण करावा, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

टॅग्स :Socialसामाजिक